Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे आदेश कुणी दिले याचा तपास सरकारने करावा त्यांच्या हातात अधिकार आहेत. तर आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते. या प्रश्नांचं उत्तर समोर आलं आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांवर आरोप केले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
Nargis Fakhri On Teachers Day: शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्रीने मानले तिच्या खास व्यक्तीचे आभार !
शरद पवार यांनी फडणवीसांवर आरोप केले…
जालन्यात मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे आदेश कुणी दिले याचा तपास सरकारने करावा त्यांच्या हातात अधिकार आहेत. तर आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते. या प्रश्नतं उत्तर समोर आलं आहे. ्सं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांवर आरोप केले आहेत.
मराठा आरक्षणावर काय म्हणाले पवार?
जालन्यात मराठा आंदोलकांवर ( Maratha Reservation ) झालेल्या लाठी हल्ल्याचे आदेश कुणी दिले याचा तपास सरकारने करावा त्यांच्या हातात अधिकार आहेत. आमच्या नाही. तर मराठा आरक्षण हे ओबीसींच्या कोट्यातून द्यावं असं काही लोकांचं म्हणण आहे. पण ओबीसींच्यावर तो अन्याय असेल त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. यावर पर्याय असा आहे की, सध्याच्या 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करण्याची दुरूस्ती विधेयक संसदेत मांडण्यात यावं. केंद्र सरकारने असं केल्यास हा प्रश्न सुटेल. मात्र यामध्ये ओबीसी आणि मराठी हा वाद निर्माण केला जाऊ नये. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
किती फसवणूक करणार! फास आवळत राऊतांचे ‘त्रिशूळ’ सरकारला चार मोठे प्रश्न
राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. त्याची माहिती घ्यावी. लोकांशी संपर्क साधावा आणि लोकांची परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहचवावी. त्यासाठी मी काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला. मराठीवाड्यात, कोल्हापूरमध्ये जाऊन आलो. तर आज जळगावमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यात राज्यात शेतीची समस्या गंभीर बनत चालली आहे. पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर ज्यांनी पेरण्या केल्या त्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे. जणावरांना चारा नाही. त्याची व्यावस्था सरकारने करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्यापुढे या समस्या मांडणार आहोत.
त्याचबरोबर राज्यात वीजेची समस्या देखील निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात देखील आम्ही राज्यसरकारपुढे प्रश्न मांडला आहे. पीकांच्या भावाचे देखील गहन प्रश्न असल्याचं यावेळी शरद पवार म्हणाले. तर जळगाव जिल्ह्यात वीज आणि पाणी हे प्रश्न गंभीर आहे. तसेच पीक विम्या संदर्भात सरकारने भूमिका घ्यायला हवी. कारण सरकारने एक रूपायात विमा दिला खरा. मात्र कंपन्या त्याला गांभीर्याने घेत नाहीत. तर सरकार आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच गोष्टींना प्रोत्साहन देणे योग्य नाही. असंही यावेळी पवार म्हणाले.