Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण आज मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक होणार आहे. आज सकाळी 10 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये आजपर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समितीकडून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे मराठा आंदोलकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी घडामोडींना वेग…
राज्यभरात आरक्षणसाठी आंदोलक आणि मनोज जरांगे हे आक्रमक झाल्याने सरकारने वेगाने या मुद्द्यावर हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात जरांगेंची खालावत चाललेली तब्येत सरकारची चिंता वाढवणारी आहे. कारण ते गेल्यावेळी उपोषण करूनही सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने पुन्हा उपोषणाला बसले आहेत.
Rahul Narvekar यांनी घेतला कायदेशीर सल्ला; आजच्या सुनावणीत न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
तर आजच्या या बैठकीत मराठीवाड्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेवर लागणाऱ्या पुराव्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याती कार्यपद्धती ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी न्यायमुर्ती संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या उपसमितीकडून आज आजपर्यंत केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
Horoscope Today : ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलेलं आहे. आज या आंदोलनाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जलत्याग केला होता. मात्र, समाजबांधवांनी केलेल्या आग्रहानंतर त्यांनी काल रविवारी पाण्याचा एक घोट घेतला.
यावेळी आतंरवाली साराटीत संभाजीराजे छत्रपती पुन्हा गेले आहेत. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अन्न आणि जलत्याग केल्यानं त्यांची तब्येत खालावली. त्यांच्या पोटात दुखू लागलं. पण, तरीही जरांगे उपोषण करत आहेत. वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला. बोलतांना त्यांना धाप लागत आहे. मराठा समाजात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळं आज संभाजीराजेंनी त्यांनी पाणी पिऊन आंदोलन करावे, अशी विंनती केली.