Download App

मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार, 147 जनावरे, 1178 कोंबड्या अन् तब्बल 10 जणांचा मृत्यू

Marathwada Unseasonal Rain :  गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार अवकाळी पाऊसाने पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या चार दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे तब्बल 153 गावामध्ये नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने अनेक जनावरे दगावली असून काही माणसांचा देखील मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने जवळपास 8 हजार हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पावसात वीज पडून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 147 जनावरे व 1178 कोंबड्या दगावल्या आहेत. यासह 54 झाडांची पडझड झाल्याची देखील माहिती आहे.

अवकाळी पावसाचं संकट 2 मे पर्यंत कायम, हवामान विभागाकडून अलर्ट जारी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

या मृत्यू झालेल्या लोकांमध्ये 6 जण हे नांदेड जिल्ह्यातील असून तिघे जण हे परभणीतील व एक जण बीडचा आहे. काल देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा फटका बसला आहे. यावेळी सोयगाव शहरातील 65 घरांवर पत्रे उडाली असून एक शेड पूर्णपणे कोसळले आहेत. सोयगाव शहरात झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची अचानक तारांबळ उडाली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचे संकट आले आहे. त्यामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. पिके सगळी आडवी झाली आहेत. अजूनही अवकाळी पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Latur APMC Election मध्ये देशमुखांचा बोलबाला, भाजपचा पत्ता झाला कट

दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी राज्यातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठावाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि प. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यानंतर 1 ते 3 मे दरम्यान वादळाचा तडाखा बसू शकतो. या दिवशी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस होईल. तसेच राज्याच्या बहुतांश भागात गारपीटही होऊ शकते

Tags

follow us