Download App

Maratha Reservation :’मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे; म्हणत तरुणानं संपवलं आयुष्य

  • Written By: Last Updated:

धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मगाणीसाठी (Maratha Reservation) मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. इतकच नाही तर सरकारही त्यांच्या मागण्यांपुढं नमतं घेतांना दिसत आहे. अशातच आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी एका ३० वर्षीय युवकाने तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. दुपारी चार वाजताच्या सुमारास ही गटना घडली.

किसन चंद्रकांत माने (30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आरोळी ठोकत गाव तलावात उडी टाकून त्याने आत्महत्या केली. ही घटना धाराशिवा जिल्ह्यातील माडज येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रत्यक्षदर्शी व्यंकट गाडे आणि मृत तरुणाचे चुलते शिवाजी माने आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन माने हा तरुण मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चर्चा करत होता. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गाडे यांच्या दुकानासमोर बसून हीच चर्चा सुरू असताना किसन गाडे याने आपले अंगावरील कपडे काढून मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असं ओरडत गाव तलावाकडे धाव घेतली. क्षणार्धात त्याने पाण्यात उडी मारली. त्याला वाचवण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला, मात्र चिखलात फसल्यने मृत्यू झाला.

Maratha Reservation : अखेर सरकारने तोडगा शोधलाच! पिढीजात पुरावा द्या अन् दाखला घ्या… 

दरम्यान, या घटनेनंतर महसूल व पोलीस प्रशासन गावात दाखल झाले असून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जोरदार घोषणाबाजी केली. गावात दाखल झालेले महसूलचे अधिकारी राजाराम केलुरकर यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेत असल्याचं सांगितलं.

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यानंतर जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष गेले. आरक्षणाबाबत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सरपंच मंगेश सांबळे या सरपंचाने स्वतःची गाडी पेटवून दिली होती.

Tags

follow us