Download App

चोरीसाठी घरात शिरला, अन् गळा आवळून केली हत्या; भाडेकरूनेच मालकिणीला संपवलं…

  • Written By: Last Updated:

Alka Gopalkrishna Talnikar case : चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या भाडेकरूने हात-पाय बांधून वृध्देचा बांधून गळा आवळल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) शहरात घडली. ही घटना 4 ऑक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil) यांनी सांगितले.

Ashok Chavan : ‘नांदेड घटनेला चव्हाणच जबाबदार’ म्हणणाऱ्यांचा वचपा काढलाच; मुश्रीफांसह शिंदेंनाही घेरलं 

अलका गोपालकृष्ण तळणीकर (70, रा. शारदाश्रम कॉलनी, पैठण गेट परिसर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अशोक गणेश वैष्णव (32, रा. डोणगाव, ह.मु. शारदाश्रम कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पैठणगेटजवळील शारदाश्रम कॉलनीत ‘श्री निवास’ नावाची इमारत आहे. तिथं अलका तळणीकर राहत असतं. त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणीचा मुलगा अजिंक्यही राहत होता. गेल्या 30-35 वर्षांपासून त्या पतीपासून विभक्त असून पती राजेश परदेशी व मुलगा अमित परदेशी हे शिरधोण (कळंबा जिल्हा धाराशिव) येथे राहतात.

आरोपी अशोक हा टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी सांगितले की, 4 ऑक्टोबरच्या रात्री अलका तळणीकर घरात एकटी असल्याचं पाहून आरोपी अशोक चोरी करण्यासाठी त्यांच्या घरात शिरला. मात्र, घरमालकीनीला जाग आली. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला शांत करण्यासाठी आरोपीने तिचा गळा आवळून खून केला.

दरम्यान, अजिंक्या अलका यांना फोन करत होता. मात्र, त्या फोन घेत नव्हत्या. त्यामुळं अजिंक्यने मेस व्यवस्थापक शंकर चौधरी यांच्याशी संपर्क साधून मावशी फोन उलतन नसल्याचं सांगून चौकशी करण्यास सांगितलं. चौधरी हे तळणीकर यांच्याकडे गेले असता त्यांना अलका बांधलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांना तातडीने घटनास्थळ गाठून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवत आरोपी अशोक याला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या हत्येमुळं परिसरात भीतीचं वातावरण आहे.

Tags

follow us