Ashok Chavan : ‘नांदेड घटनेला चव्हाणच जबाबदार’ म्हणणाऱ्यांचा वचपा काढला; मुश्रीफांसह शिंदेंनाही घेरलं

Ashok Chavan : ‘नांदेड घटनेला चव्हाणच जबाबदार’ म्हणणाऱ्यांचा वचपा काढला; मुश्रीफांसह शिंदेंनाही घेरलं

Ashok Chavan Vs Hasan Musrif : हसन मुश्रीफांनी कृपया राजकीय टीकाटिप्पणीचा पोरखेळ न करता हा विषय गांभीर्याने घ्यावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हॅंडलवरुन दिला आहे. नांदेड घटनेला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अशोक चव्हाणांवर नांदेड घटनेचं खापर फोडलं होतं. त्यावरुन अशोक चव्हाणांनी हसन मुश्रीफांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही घेरलं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, नांदेड रुग्णालयातबाबत आमदर मोहन हंबर्डे यांनी हिवाळी अधिवेशनात सविस्तर माहिती दिली होती. याची आठवण मंत्री मुश्रीफ यांना चव्हाण यांनी करून दिली. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्याचवेळी दखल घेऊन योग्य पावले उचलली असती तर कदाचित नांदेडची दुर्दैवी घटना टळू शकली असती.

Rohit Saraf: नॅशनल क्रश रोहित सराफने आपल्या तेजस्वी हास्याने जागतिक हास्य दिन केला साजरा

विद्वान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचा आमदार म्हणून या घटनेसाठी माझ्यावर दोषारोप करणार असतील, तर मग ठाण्यातील महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत झालेले १८ मृत्यू, नागपूरच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी झालेले २३ मृत्यू, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात २४ तासांत झालेल्या १४ मृत्यूंसाठी कोण जबाबदार आहे, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट करावे, असं खुलं चॅलेंजच अशोक चव्हाणांनी मंत्री मुश्रीफांना दिलं आहे.

Mumbai News : डेक्कन एक्सप्रेस पकडताना कल्याण स्थानकावर अपघात; एकाचा मृत्यू

तसेच निश्चितच नांदेड हा माझा जिल्हा आहे. केवळ नांदेडच नव्हे तर राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृती होऊ नये, यासाठी मी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कोणतेही राजकारण न करता समन्वयाची भूमिका घेतली. आरोग्य सेवेतील उणिवा दूर करण्यासाठी अनेक विधायक सूचना केल्या. संबंधित खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कृपया राजकीय टीकाटिप्पणीचा पोरखेळ न करता हा विषय गांभीर्याने घ्यावा, वस्तुस्थिती स्वीकारावी आणि आरोग्य सेवेत सुधारणा करून रुग्णांची गैरसोय कशी दूर करता येईल, याकडे लक्ष देणे राज्याच्या हिताचे आहे, असा सल्लाही चव्हाणांनी मंत्री मुश्रीफांना दिला आहे.

काय म्हणाले होते मुश्रीफ?
अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील आमदार आहेत. ते याआधी माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. या घटनेआधीपासूनच अशोक चव्हाण यांची रुग्णालयाला महिन्यातून एकदा दोनदा भेट देणं ही त्यांची जबाबदारी होती. मात्र, त्यांनी तसं केलं असतं आज ही वेळ आली नसल्याची टीका मुश्रीफ यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube