Download App

Abdul Sattar : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची हेळसांड! विहीर मिळाल्या, पण ६ वर्षांपासून विजेपासून वंचित

Abdul Sattar : आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांना डोंगराळ भागात मिळालेल्या जमिनीत सिंचन विहिरी (wells) देण्यात आल्या. या विहिरीच्या पाणी पिकांना देण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून कोटेशन भरूनही विद्युत पुरवठा (Power supply) मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यातून समोर आला. वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील शेतकरी विद्युत पुरवठ्यापासून वंचित आहेत.

पाराळा या डोंगराळ भागातील आदिवासी भिल्ल समाजाला मोठ्या संघर्षानंतर शासनाकडून जमिनी देण्यात आल्या आहेत. जमिनी नावावर झाल्यानंतर झेडपी मार्फत बिरसा मुंडा कृषि क्रांतियोजनेतून (Birsa Munda Agricultural Revolution Scheme) येथील 9 आदिवासी (भिल्ल) समाजातील शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी अनुदान दिले. विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये विद्युत पंपासाठी कोटेशन भरले आहे. तेव्हापासून हे नऊ आदिवासी शेतकरी व इतर तीन शेतकरी अवघ्या अडीच किलोमीटरच्या अंतरापासून विद्युत पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहे. वारंवार मागणी निवेदन करूनही गेल्या सहा वर्षांपासून त्यांचा हा वनवास सुरू असल्याने शेतकऱ्यांना विहिरीचा कुठलाच उपयोग घेता येत नाही.

निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांकडे रोहित पवारांनी केलं दुर्लक्ष, व्हिडिओ होतोय व्हायरल

एकीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सरकार मोठा निधी खर्च करते. तर दुसरीकडे शेतीसाठी पाण्याची, सिंचनाची सोय झाली तर विद्युत पुरवठा मिळण्यासाठी शासनाकडून हेळसांड होत आहे.

दरम्यान, विद्युत पुरवठा मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा भीमाबाई बुधा ठाकरे, अलकाबाई हरीचंद्र मोर, भाऊसाहेब किसन पवार, कारभारी धोंडीबा वाघ, बाळू कारभारी मोरे, पुंडलिक तुकाराम मोरे, तुकाराम एकनाथ मोरे, रामाभिका मोरे, कोंडिराम तुकाराम पवार, योगेश भाऊसाहेब त्रिभुवन, शकील नुरखान पटेल व रफिक नुरखाण पटेल या शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

Tags

follow us

वेब स्टोरीज