दिपकेंच्या शाळा भेटीनंतर सीसीटीव्ही आले अन् पंखाही ; चोवीस तासांत हिंगोली झेडपीला खडबडून जाग !

Abijeet Dipke : . दीपके यांच्या भेटीनंतर हिंगोली जिल्हा परिषदेचा जाग आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आता शाळेची दुरुस्ती हाती घेतलीय.

Hingoli Abhijeet Dipke

Hingoli Abhijeet Dipke

Abijeet Dipke Santuk Pimpri School Visited: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) अध्यक्ष अभिजित दीपके यांनी (Abijeet Dipke) यांनी ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियानाला सुरुवात केलीय. 15 ऑगस्टला ते मूळगावी हिंगोलीतील संतुक पिंपरी (Santuk Pimpri) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेटीसाठी गेले होते. तेथील शाळांमध्ये प्राथमिक सोयी-सुविधा आढळून आल्या आहेत. दीपके यांच्या भेटीनंतर हिंगोली जिल्हा परिषदेचा जाग आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आता शाळेची दुरुस्ती हाती घेतलीय. त्यामुळे दीपके यांच्या मोहिमेला सुरुवातीलाच यश आले आहे.


वादग्रस्त जाहिरातीनंतर अमित ठाकरेंचा भावेश कावरेंना जाब, कावरेचा माफीनामा

दिपके यांनी शाळेला भेट दिल्यानंतर 24 तासाच्या आत शाळा दुरुस्तीला संतुकपिंपरी गावामध्ये सुरुवात झाली आहे. रविवारी देखील शिक्षण विभागाचे कर्मचारी आणि शिक्षक खिडक्या दुरुस्त करून घेत आहेत. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहेत. आता जिल्हा परिषदेकडून या शाळेची सर्वच दुरुस्ती केली जाऊ शकते.

सरकारने एक्सवरील कोणत्या कंटेंटवर बंदी घातली ? मिळणार संपूर्ण माहिती; एलन मस्क यांची घोषणा

स्वांतत्र्यदिनापासून अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्रातील हिंगोलीतील संतुक पिंपरी येथील शाळेतून ‘सरकारी स्कूल ठीक करो’ या अभियानाची सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेत आढळलेल्या अव्यवस्थेमुळे ते संतप्त झाले होते.


दारूड्या मुख्याध्यापकांना हटविणार का ?

येथील शाळेतील मुख्याध्यापक हा दारू पिवून येत असल्याची तक्रार दिपके यांच्याकडे ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर दिपके यांनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांना फोन करून, “दारू पिणाऱ्या मुख्याध्यापकांना हटवा, नाहीतर गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू,” असा इशारा दिला आहे. अद्यापपर्यंत यावर निर्णय झालेला नाही. शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तसेच शौचालयातही पाण्याची सुविधा, शाळेची तुटलेली खिडकी एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरने झाकण्यात आल्याचे भेटी दरम्यान आढळून आल्या आहेत.

Exit mobile version