Download App

एक कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं…; लाचखोर पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडलं कोट्यावधीचं घबाड

लाच घेतल्याच्या आरोप असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Haribhau Khade) यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली.

Beed News: बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बॅंकेतील (Jijau Multistate Cooperative Bank) घोटाळ्याप्रकरणी लाच घेतल्याच्या आरोप असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Haribhau Khade) यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. झडती दरम्यान, विभागाच्या पथकाला कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे. हरिभाऊ खाड सध्या फरार आहेत.

उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी जमीन द्या; शिंदे सरकारला ‘सुप्रीम’ सूचना 

काही दिवसांपूर्वी बीडच्या जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये घोटाळा झाला होता. या प्रकरणी प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चौघांवर गु्न्हे दाखल झाले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात एका व्यापाऱ्याच्या खात्यात 60 लाख रुपये जमा करण्यात आले होते. तसेच पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व कॉन्स्टेबल जाधव यांनी दुसऱ्या सहकाऱ्यास आरोपी न करण्यासाठी त्याच्याकडे एक कोटी रुपयांची लाच मागितली होती.

क्लार्क पदासाठीची प्रतिक्षा यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध 

चर्चेनंतर 30 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देतांना एका व्यापाऱ्यास अटक करण्यात आली. तर हरिभाऊ खाडे आणि जाधव फरार आहेत. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीडमधील चाणक्यपुरी भागातील हरिभाऊ खाडे यांच्या घराची झडती घेतली होती.

या पोलिस निरीक्षकाकडे 1 कोटी 8 लाख रुपये रोख, सोन्याची बिस्किटे आणि दागिने असा 72 लाखांचा ऐवज आहे. तसेच 4 लाख 62 हजार रुपयांची 5.5 किलो चांदीही आहे. याशिवाय बारामती, इंदापूर येथे फ्लॅट आणि इंदापूरमध्ये व्यापारी गाळा आहे. सोबतच बारामती आणि परळी येथे देखील काही स्थावर मालमत्ताही आढळून आली आहे. हा सर्व मुद्देमाल आणि मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे करीत आहेत.

follow us

वेब स्टोरीज