Download App

अंबादास दानवे म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीत एकजूट…

Ambadas Danve On Sharad Pawar Retirement : शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादीमध्ये (NCP) कोणत्याही प्रकारची दुफळी माजली किंवा एकजूट नाही असं म्हणता येणार नाही, उलट पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी जागृत होऊन एकत्र आली असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve)सांगितलं आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. पवारांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादीमध्ये दुफळी माजली आहे का असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पत्रकारांनी विचारला, त्यावर ते दानवे म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारची दुफळी माजलीय किंवा एकजूट नाही असं म्हणता येणार नाही. उलट शरद पवार साहेबांच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी जागृत होऊन एकत्र आलेली आहे. पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी घेतली आहे, पण तरिही तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही यावेळी अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

तब्बल बारा वर्षांनंतर पाकिस्ताचे पराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर आत्ताच्या सरकारकडून जी पूनर्विचार याचिका दाखल करण्याचं सुतोवाच केलं जे नविन आयोग तयार करण्याचं सुतोवाच केलं, या दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत. गायकवाड आयोगाने अतिशय उत्तमरित्या मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. याच गायकवाड आयोगाच्या शिफारशीला मूळ धरुन आरक्षण मागितली पाहिजे.

नुकतेच झारखंडमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मला वाटतं मराठा समाजाची मागणी हीच आहे की, कोणत्याही समाजाचं आरक्षण न हिसकावता, 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकावी. त्यासाठी संसदेनं त्यासंदर्भात कायदा करण्याची गरज आहे. राज्यात भाजपचं सरकार आहे आणि देशातही भाजपचं सरकार आहे.

भाजपचे नेते हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यावर असं म्हटलं होतं की, भाजपचं सरकार येऊ द्या, आम्ही चार दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ, याची आठवण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करुन दिली आहे.

आता राज्यातील सरकारला नऊ ते दहा महिने झाले आहेत. म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असंही ते म्हणाले. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडायला कुचकामी ठरलं आहे. मराठा समाजाचा अंत आत्ताचं राज्य सरकार पाहात आहे, असा आरोपही यावेळी अंबादास दानवे यांनी केला आहे.

Tags

follow us