Download App

Maratha Reservation : ‘होय, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे’; बागेश्वर बाबांनी कारणही सांगितलं

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) सध्या राज्यात चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच क्षेत्रातून पाठिंबा मिळत असतानाच आता बागेश्ववर धाम बाबांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा (Dhirendra Krishna Shastri) दरबार भरणार आहे. अयोध्यानगरी मैदानावर भव्य कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत धीरेंद्र शास्त्री यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थन केले.

या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. राज्यात मोठं आंदोलन सुरू आहे अशा परिस्थितीत मराठ्यांना खरंच आरक्षण मिळेल का, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असे सांगितले. भारत ज्यावेळी गुलामगिरीत होता तेव्हा देशाला गुलामीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठा समाजाने केले आहेत. भारताला स्वतंत्र करण्याचे श्रेय सर्वाधिक मराठ्यांनाच जातं. बागेश्वर पीठ मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा मेगा प्लॅन! पुन्हा सुरू करणार महाराष्ट्र दौरा

मला मनातील गोष्ट वाचता येणे हा वेगळा विषय आहे. अधिकारांची गोष्ट करणे हा वेगळा विषय आहे. भारत जेव्हा संकटात होता, तेव्हा आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या जमातीला आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे मत धीरेंद्र शास्त्री यांनी व्यक्त केले.

त्या हल्ल्याची एसआयटी चौकशी करा – मनोज जरांगे पाटील 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान (Maratha Reservation) पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा आता तापू लागला. या लाठीचार्जवेळी काही पोलिसही जखमी झाले होते. त्यामुळे या घटनेची चौकशी होऊन ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आंतरवालीतीसल हल्ल्यामागे मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे या हल्ल्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. जरांगे पाटील म्हणाले, आता काही जण शांततेत आंदोलन करत असताना त्यांना अडकवले जात आहे. आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागत आहोत. आमचंच आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही म्हणत आहोत.

follow us