Beed : जिल्ह्यातील खापर पांगरी येथील उच्चशिक्षित युवा प्रयोगशील शेतकरी ईश्वर शिंदे आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतो. ईश्वरने आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. हा प्रयोगशील इंजिनिअर शेतकरी आपल्या शेतामध्ये करत असलेले प्रयोग ऐकून स्वतः कृषीमंत्री चकीत झाले. शेतकरी आयुर्वेदिक गुणकारी काळ्या उसाची शेती करत आहे. या भेटीदरम्यान तो गुणकारी ऊस कृषीमंत्र्यांना दाखवण्यासाठी आणला. त्याच्या या उसाला 20 ते 50 हजार रुपये प्रतिटन भाव मिळत असल्याचे यावेळी त्या युवा शेतकऱ्याने सांगितले. बीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये काळ्या उसाच्या शेतीचा प्रयोग या युवा शेतकऱ्याने यशस्वी करुन दाखवल्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्याची प्रशंसा केली आहे.
Bharat Jadhav: भरत जाधवचं नवं नाटक येणार चाहत्यांच्या भेटीला; पोस्ट शेअर करत म्हणाला…
बीड तालुक्यातील खापर पांगरी येथील युवा शेतकरी इंजिनिअर ईश्वर शिंदे याने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीदरम्यान त्यांना दाखवण्यासाठी काळा ऊस आणला होता, तो ऊस आयुर्वेदिक दृष्टीने गुणकारी, गोड व खाण्यास अत्यंत सोपा असल्याची माहिती ईश्वरने सांगितल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हा ऊस खाऊनच पाहिला. ईश्वरच्या ऊस उत्पादनातील नवनवीन प्रयोगांची माहिती घेऊन धनंजय मुंडे यांनी त्याचे कौतुक केले.
Karan Kundra Look: स्वातंत्र्य दिनासाठी अभिनेता करण कुंद्राची अनोखी फॅशन पाहिलात का?
बीड तालुक्यातील खापर पांगरी येथील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला ईश्वर शिंदे हा तरुण काळा ऊस, दोन वर्ष टिकणारे विशिष्ट फूल, अशा विविध पिकांची विशिष्ट पद्धतीने शेती करतो. ईश्वरच्या काळ्या उसाला 20 हजार ते 50 हजार रुपये प्रतिटन इतका भाव मिळाला आहे. तो विविध कृषी प्रदर्शने, कृषी महोत्सव अशा अनेक शेतीविषयक कार्यक्रमांमध्ये तो सहभाग घेतो.
याबद्दल माहिती देण्यासाठी आज ईश्वरने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची बीड येथील विश्रामगृहात भेट घेतली. यावेळी काळ्या उसाचे महत्व व गोडवा ऐकून धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्षच ऊस खाऊन पाहिला.
उसाची गोडी, त्याला उत्पादन करण्यासाठी लागणारे श्रम, त्याची गुणकारकता याबाबत कृषीमंत्री महोदयांना माहिती देत असताना, त्यांनी चक्क ऊस खाऊनच बघितला व त्यावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर मुंबईला खास भेटायला बोलावले, हा माझ्यासाठी खूप सुखद अनुभव होता. एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीच एका शेतकऱ्याच्या श्रमाचे मोल जाणू शकतो, अशा शब्दात ईश्वरने आपली भावना व्यक्त केली आहे.