मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना थेट मुंबई पोलिसांची नोटीस, काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना मुंबई पोलीसांनी नोटीस जारी केली आहे. ही नोटीस अचानक पाठवण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटलांची अडचण वाढली आहे. (Jarange) मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना मुंबईतील आझाद नगर पोलीसांनी नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीशीत जरांगे पाटलांना 10 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मार्च-एप्रिलमध्ये मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि आणखी काही सहकाऱ्यांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. यात तपासाच्या अनुशंगाने चौकशी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीत त्यांना 10 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Video : धनंजय मुंडेंच्या पलटवारानंतर जरांगे पुराव्यांसह मैदानात, मुंडेंची थेट रेकॉर्डिंगच ऐकवली
मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे हे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी काल नार्को टेस्ट करण्यासाठी आपण तयार आहे आणि पहिला अर्ज मीच करणार असं सांगितलं होते. आज त्यांनी अर्ज लिहिलेला आहे आणि त्यांचे सहकारी पांडुरंग तारख हे सदरील अर्ज घेऊन जालन्याच्या दिशेने रवाना झालेले आहे. पोलीस अधीक्षकांना हा अर्ज सुपूर्द करण्यात येणार आहे त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रह विभाग न्याय व विधी विभाग यांचा उल्लेख केलेला आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. यावर उत्तर देताना मुंडे यांनी हे आरोप फेटाळले होते. तसेस मराठा ओबीसींमध्ये वाद लावण्याचे काम जरांगे पाटील करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. जरांगे हत्येच्या कटात सहभागी असलेल्या काही लोकांची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली होती. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापले आहे.
