Download App

ज्योती मेटे यांचा कुणाला पाठिंबा?, पत्रकार परिषदेत केली मोठी घोषणा

बीड लोकसभेत आपला कुणालाही पाठिंबा नाही अशी घोषणा ज्योती मेट यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

  • Written By: Last Updated:

Jyoti Mete Press Conference : आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. यामध्ये मतदान करणे आणि पाठिंबा जाहीर करणं या बाबी वेगळ्या आहेत अशी प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली आहे. (Jyoti Mete) त्या पुण्यात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Beed Lok Sabha) यावेळी त्यांना अशा भूमिकेने आपल्या संघटनेचं नुकसान होणार नाही का? असा प्रश्न विचारला असता मेटे म्हणाल्या आम्ही लोकसभाचं लढवत नाहीत त्यामुळे तसं काही होणार नाही. मात्र, कुणाला पाठिंबा यावर थेट बोलणं त्यांनी टाळलं.

 

आधी बीडच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, भुजबळांनी पंकजा मुंडेंना सुनावलं

बजरंग सोनवणे यांना उमेदवारी

ज्योती मेटे या शासकिय सेवेत होत्या. त्यामधून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी आपण पुर्णवेळ राजकारणात काम करणार आहोत असं जाहीर केलं. त्याचवेळी त्यांनी आपण लोकसभा लढवणार असल्याचीही घोषणा केली होती. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही भेट घेतली होती. पंरतु, महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली.

 

उपक्ष निवडणूक लढवण्याचा होता विचार

महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे आता वंचित किवां शिवसंग्रामकडून लोकसभा लढवती अशी जोरदार चर्चा होती. त्यातचं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या उलट-सुटल चर्चा सुरू होत्या. त्याचबरोबर त्या उपक्ष निवडणूक लढवतील असंही बोललं जात होतं.

 

Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

समाजासाठी जीव गमावला

मेटे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना स्व: विनायक मेटे यांनी समाजासाठी जीव गमावला असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला अशी चर्चा होती. परंतु, आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मेटे यांनी आपला कुणालाच पाठिंबा नाही असं जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

follow us