Beed Lok Sabha : बीडच्या मैदानात वंचित आघाडीची एन्ट्री! अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर

Beed Lok Sabha : बीडच्या मैदानात वंचित आघाडीची एन्ट्री! अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर

VBA Announced Candidate for Beed Lok Sabha : बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री झाली आहे. या मतदारसंघात आघाडीने महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याविरोधात अशोक हिंगे यांना तिकीट दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने आज अशोक हिंगे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. अशोक हिंगे यांच्या (Ashok Hinge) उमेदवारीचा कुणाला फटका बसतो यावरच जय पराजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. बीड मतदारसंघात पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लढत होईल असे वाटत होते. परंतु, वंचित आघाडीने उमेदवार दिल्याने गणित बदलले आहे.

Bhiwandi Loksabha 2024 : महाविकास आघाडीत बंडाचे वारे; भिवंडीत राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस नेत्यांनी ठोकला शड्डू

ज्यावेळी महायुतीने पंकजा मुंडे यांची (Pankaja Munde) उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर कोणता उमेदवार द्यायचा असा प्रश्न विरोधकांसमोर होता. ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर महाविकास आघाडीने सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारांकडून प्रचार सुरू झाला आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केला. ज्योती मेटे यांना महाविकास आघाडीने तिकीट दिले नाही. आता वंचित बहुजन आघाडीकडून त्यांचा विचार होऊ शकतो, वंचित आघाडीत ज्योती मेटे प्रवेश करू शकतात अशा चर्चा मतदारसंघात सुरू होत्या. परंतु, अशोक हिंगे यांच्या उमेदवारीनंतर या चर्चा आता थांबल्या आहेत.

वंचितने उमेदवारी दिलेले अशोक हिंगे पाटील सुद्धा जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आता आघाडीने त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या एन्ट्रीने बीड मतदारसंघातील लढत आता अधिक अटीतटीची होणार आहे.

मविआच्या अल्टिमेटमनंतर Prakash Ambedkar यांचा ठाकरे-पवारांना बाजूला सारत कॉंग्रेसला नवा फॉर्म्युला!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube