Download App

Video : “बेगडी शरद पवारांची बेगडी लेक, त्यांच्या मतदारसंघात…”, हाकेंची घणाघाती टीका

शरद पवार हे बेगडी पुरोगामी नेते आहेत. त्यांच्याच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रिया सुळे या त्यांच्या वर्तणुकीतून दाखवून देत आहेत.

Laxman Hake Criticized Supriya Sule : मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. या हत्याकांडाचा तपास सुरू आहे. याच मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप होत आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईन हा माझा शब्द आहे, असे वचन सुप्रिया सुळे यांनी दिले. यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. बेगडी शरद पवारांची बेगडी लेक अशा शब्दांत टीका केली.

हाके पुढे म्हणाले, शरद पवार हे बेगडी पुरोगामी नेते आहेत. त्यांच्याच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रिया सुळे या त्यांच्या वर्तणुकीतून दाखवून देत आहेत. सुप्रिया सुळे मस्साजोगला गेल्या त्याबद्दल त्यांचं ठीक आहे. त्याच सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील भोर तालुक्यातील एका गावात तरुणाची हत्या झाली. त्या प्रकरणी बेगडी शरदचंद्र पवार साहेबांची बेगडी लेक सुप्रिया सुळे यांना इतर जातीतल्या हत्या दिसत नाहीत. ह्यांचं बेगडी पुरोगामित्व किती आहे हे राज्याला चांगलंच दिसतंय. आता त्यांच्याकडून दुःखद प्रसंगावर राजकारण केलं जात आहे यातूनच त्यांचा खरा चेहरा दिसत आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

“कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती अॅग्रो नाही, राम शिंदेंमुळे..”, आ. जगतापांचा रोहित पवारांना खोचक टोला

फडणवीसांना बीड जिल्ह्यात स्पेस मिळत नव्हती. म्हणून त्यांनी सुरेश धसांचा वापर केला. धसांमुळे त्यांना बीड जिल्ह्याचे दरवाजे खुले झाले असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावर हाके म्हणाले, खरंतर रोहित पवार फक्त हजार ते पंधराशे मतांनी निवडून आले आहेत. आता त्यांचीच स्पेस संपून गेलीय. कसेबसे निवडून आले आहेत. बीडमध्ये आधीच महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्हा कुणाचा आहे आणि देवेंद्र फडणवीसांना बीड जिल्ह्यात स्पेस शोधण्याची काय गरज आहे.

Video : मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर पदर पसरणार; देशमुखांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे आक्रमक

तुम्हाला (रोहित पवार) या प्रकरणाच्या आडून राजकारण सुचतंय. त्यांना राजकारणा पलीकडे काहीच येत नाही. पवार फॅमिली फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलेली फॅमिली होती. परंतु, आता तेही उघडे पडले आहेत. त्यांना अन्य जातींतल्या हत्या दिसत नाहीत. हत्यांच्या हत्याऱ्यांना शिक्षा झाली पाहीजे हे मान्यच आहे. पण अन्य हत्यांकडे हे लोक पाहत सुद्धा नाहीत, अशी खंत हाके यांनी व्यक्त केली.

जरांगे अन् कराड भेट कशासाठी, जरांगे उत्तर द्या

ज्या पद्धतीने वाल्मिक कराड आणि मनोज जरांगे यांची चार ते पाच महिन्यांपूर्वी पहाटेच भेट झाली होती. त्यांची भेट ज्या अर्थाने झाली होती. त्याच अर्थाने सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झालेली असावी. त्यामुळे या दोन भेटींकडे मी काही वेगळ्या भावनेने पाहत नाही. मनोज जरांगे आज जसे सुरेश धसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. मग आता जरांगेंना कोणत्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं? त्यांनी वाल्मिक कराडांबरोबर कशासाठी भेट घेतली होती. याचं उत्तर जरांगेंनी महाराष्ट्राला दिलं तर बरं होईल.

 

follow us