Parli Road Accident : मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. आताही एक धक्कादायक बातमी बीड जिल्ह्यातूनच आली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यतील निरवट येथे घडली. या घटनेची राज्यात चर्चा सुरू झाली आहे तसेच परळीतील अवैध राख वाहतुकीचा मु्द्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील मिरवट फाटा याठिकाणी हा अपघात झाला. या अपघातात क्षीरसागर गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बीड प्रकरणावर धसांचं नाव घेत पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या म्हणाल्या, त्यांच्यामुळे..
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की टिप्परची धडक बसताच क्षीरसागर दुचाकीवरुन काही मीटर दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या दुचाकीचाही चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली. क्षीरसागर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हा खरंच अपघात होता की घात होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील सत्य बाहेर येईल.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीड राज्यभरात गाजत आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात आता आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लोकांमध्येही वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता या अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तपासातून काय माहिती बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बीड : धनजंय मुंडेच्या नेटवर्कचा नायनाट करा; मकोका दाखल होताच जरांगेंची फडणवीसांकडे मोठी मागणी