बीड : धनजंय मुंडेच्या नेटवर्कचा नायनाट करा; मकोका दाखल होताच जरांगेंची फडणवीसांकडे मोठी मागणी
Manoj Jarange On Beed Murder Case Mocca Act : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी ७ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जरांगेंनी फडणवीसांकडे राज्यात धनंजय मुंडेने पसरवलेले गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायना करण्याची मागणी केली आहे. ते धाराशीवमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आयोजित जनआक्रोश मोर्चात बोलत होते.
…तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ टिकेल; वकील माजिद मेमन काय म्हणाले?
जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात येईल असा शब्द अधिवेशनात आणि देशमुख कुटुंबियांना दिला होता. तसेच अंडर ट्रायल हे प्रकरण चालवलं जाणार एवढेच काय तर सर्व आरोपींनी फासावर लटकवलं जाणार कोणालाही सोडलं जाणार नाही असा शब्द फडणवीसांनी दिला आहे. त्यानंतर आज या प्रकरणात मकोका लावण्यात आला आहे. पण, आमची फडणवीसांकडे एक प्रामाणिक आणि मोठं मागणं आहे आणि ते म्हणजे राज्यात धनंजय मुंडेने जे गुंडगिरीचं नेटवर्क पसरवले आहे त्याचा नायनाट करून टाकण्याची मागणी जरांगेंनी केली फडणवीसांकडे केली आहे.
Video : मुलीची राजकारणात एन्ट्री ते घरातील शेवटचा राजकारणी कोण?; फडणवीसांच्या उत्तराने नवी चर्चा
या टोळीविरोधात बलात्कार, दरोडे, खून करण्यापासून ते लोकांच्या जमीनी बळकवण्याच्या तक्रारी आतंरवलीत परळीपासून ते मुंबईपर्यंत समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे फडणवीसांनी ही जी साखळी मोडीत काढावी आणि खंडणी आणि खून करणारे हे दोन्ही एकच असून त्यांना सर्वांना 302 मध्ये घालावे असे जरांगे म्हणाले. आता जे खंडणीतील आरोपी आहेत त्यांनापण 302 मध्ये टाकणे गरजेचे असल्याचे जरांगे म्हणाले आणि ते फडणवीस टाकतील अशी आम्हाला आशा आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करणार हा शब्द दिला आहे म्हणून तर मराठे शांत बसले असल्याचे ते म्हणाले.
Video : पुण्यात आकाची किती संपत्ती?; आकडेवारी सांगत सुरेश धसांनी नवा डाव टाकला
हे सर्व आत जाऊ द्या. राज्यातील जेवढी साकळी आहे ते ४०० ते ५०० असतील. आंदोलन करणारी ही संघटक गुन्हेगारी करणारी टोळी आहे. धनंजय मुंडेंनी ही टोळी पाठवली आहे. आंदोलन करायला. ही लाभार्थी टोळी तपासा. हे सहआरोपी होऊ शकतात आणि परभणी प्रकरणालाही न्याय द्यावा असेही जरांगे यांनी म्हटले आहे.