Download App

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, तिघांचा जागीच मृत्यू; लग्नासाठी जाताना काळाचा घाला..

वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Road Accident) आहे. भरधाव वेगातील वाहने नियंत्रत होत नाहीत त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. आताही भीषण अपघाताची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. याठिकाणी दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. हा अपघात इतका भीषण होता की यात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, या जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर हा अपघात झाला. या रस्त्यावर दोन दुचाकी अगदी समोरासमोर येऊन धडकल्या. यात तिघे जण जागीच ठार झाले. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. आकाश मच्छिंद्र साठे, सुमित अप्पासाहेब आव्हाड आणि मुस्ताक मुनीर शाह अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

धक्कादायक! विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळला; ढिगाऱ्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू..

याबाबत अधिक माहितीनुसार, आकाश आणि सुमित दोघेही एका लग्नासाठी दुचाकीवरुन निघाले होते. तर याचवेळी मुस्ताक आणि मुबारक हे दोघे जण तुर्काबादकडे निघाले होते. याच दरम्यान शिरोडी शिवारात असताना दोन्ही दुचाकी समोरासमोर येऊन धडकल्या. या अपघातात चौघे जण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.

बुलढाण्यात तिहेरी अपघात! 5 प्रवाशांचा मृत्यू, 24 जण जखमी; बोलेरो वाहनाचा चेंदामेंदा

follow us