बुलढाण्यात तिहेरी अपघात! 5 प्रवाशांचा मृत्यू, 24 जण जखमी; बोलेरो वाहनाचा चेंदामेंदा

Buldhana Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Buldhana Accident) चालली आहे. वाहने भरधाव वेगात असल्याने यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. आताही बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खासगी प्रवासी बस, एसटी बस आणि बोलेरो जीप या तीन वाहनांचा अपघात झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे बोलेरो जीप एसटी बसला धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अपघातातील जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, ट्रकला धडकली कार; अभिनेत्याने सांगितलं काय घडलं?
या अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे झाला याचीही माहिती अजून समोर आलेली नाही. बोलेरो जीप भरधाव वेगात शेगावहून कोल्हापुरकडे निघालेली होती. याच वेळेस एसटी महामंडळाची बस परतवाडाकडे चालली होती. यातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मयतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.
Jalna Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार