Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नसल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे…
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सोसह विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यावर मुंडे यांनी भाष्य करुन सरकारला घरचा आहेर दिलाय.
हसन मुश्रीफ सोडून कोणी आहे का? अजितदादांच्या प्रश्नानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीत शांतता…
खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या, ज्यावेळी महिलेची अशी कुठली तक्रार येते तेव्हा त्या तक्रारीची तपासणी चौकशी समितीकडून करुन योग्य अयोग्य काय हे तपासले पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी यावेळी बोलताना केलीय.
Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
तसेच जर सरकारने महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नसल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे ब्रिजभूषण सिंहे हे भाजपमध्ये सक्रिय नेते असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. सिंह यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंच्या आंदोलनामुळं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कुस्तीपटूंना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे.