Chhatrapati Sambhajinagar : मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढलं आहे. संभाजीनगरमध्ये सातत्याने दरोडे, घरफोडीच्या (Robbery) घटना समोर येत आहेत. आताही संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) परिसरातील एका उद्योजकाच्या घरी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दरोडेखोरांनी तब्बल ८ किलो सोनं आणि ४० किलो चांदी, असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला. उद्योजकांचे नाव संतोष राधाकिशन लड्डा (Santosh Radhakishan Ladda) असं आहे.
अग्नितांडव! 80 प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणाऱ्या बसला लागली आग, 5 जणांचा होरपळून मृत्यू
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लड्डा यांचा मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेत आहे. आठ दिवसांपूर्वी लड्डा कुटुंब त्याला भेटण्यासाठी परदेशात गेले होते. लड्डा कुटुंब परदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. दरोडेखोरांनी घरात असलेल्या ड्रायव्हर आणि केअरटेकरचे हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. केअरटेकरला डोक्यावर बंदूक ठेवत धमकी देत त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मौल्यवान दागिने आणि चांदी चोरून नेली.
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या लाल ड्रेसमध्ये किलर अदा
प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोरांनी सुमारे ८ किलो सोने आणि ४० किलो चांदी दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांच पथक, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.