तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, बीड कारागृहात चाललय काय?

अजहर पठाणने कारागृह प्रशासनाला दिलेल्या पत्रात खळबळजनक दावा केला आहे.

News Photo   2026 04 25T144019.118

तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, बीड कारागृहात चाललय काय?

बीडच्या वर्ग-२ चे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कैद्यांनी नियमानुसार बाहेर केलेल्या (Beed) कॉलचे कथित रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी नवी क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजकीय वादाशी जोडले जात असल्याचं दिसत आहे.

सलग ३ दिवस ‘व्हायरल’ सत्र

पहिली क्लिप : तीन दिवसांपूर्वी अजहर पठाण याने सुदर्शन घुले टोळीवर मारहाणीचा आरोप करणारी क्लिप व्हायरल झाली.

दुसरी क्लिप : दुसऱ्याच दिवशी पठाणने ‘यू-टर्न’ घेत जेल कर्मचाऱ्याच्या दबावाखाली आपण असे बोलल्याची क्लिप व्हायरल झाली.

तिसरी क्लिप : शुक्रवारी पुन्हा सनी आठवलेची कथित क्लिप व्हायरल झाली, ज्यात तो मारहाणीचा पुनरुच्चार करताना ऐकू येतो. कैदी कॉन्फरन्स कॉलचा वापर करून हे रेकॉर्डिंग करीत असल्याचा संशय आहे.

‘मस्साजोग’ प्लॅन

अजहर पठाणने कारागृह प्रशासनाला दिलेल्या पत्रात खळबळजनक दावा केला आहे. मस्साजोग सरपंच पदाची निवडणूक सुरू असून, वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगला बदनाम करण्यासाठी कुख्यात दादा खिंडकर याने हा ‘प्री-प्लॅन’ आखल्याचा संशय पठाणने व्यक्त केला आहे.

मागील रेकॉर्डिंगमध्ये काय ?

– अझहर पठाणला मारहाण झाली होती, त्याचे सगळे स्टेटमेंट बदलले आहेत.
– वाल्मिक कराडला बंदी झालेली असताना रात्री साडेआठ वाजता बाहेर काढून त्याचा जबाब घेतला आहे.
– रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक तीनमध्ये आणून टाकले.
– सगळे अधिकारी त्याच्यावर दबाव आणत आहेत, 10 हजार रुपयांची कॅन्टीन देतो, बाहेर तुला पैसे देतो अशी वाल्मिक कराडने लालूस दिलं आहे.
– जर त्याने ती चिठ्ठी लिहिली तर ती बाहेर कोणी आणली याची चौकशी व्हायला पाहिजे.
– वाल्मिक कराडने आणि त्याच्या गँगने खोटे गुन्हे दाखल केले आणि असेच लोकं मारलेले आहेत.
– आणि आता माझ्या जेल बदलीच्या मागे लागलेले आहेत.
– बाहेरच्या पथकाने इथे येऊन झडती घ्यायला पाहिजे.
– त्याच्याकडे किती आणि कोणाच्या नावावर सिम कार्ड आहेत ते मला माहित आहे. त्याला कोण कॅन्टीन देतो, कोण पैसे देतो, आणि कोण पैसे घेतं हे सगळं मला माहित आहे.
– सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय.
– वाल्मिक कराडला नवीन डिश टीव्ही दिली आहे. सगळी व्हीआयपी सुविधा भेटते त्यांना इथे.
– अंजली दमानिया आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याची चौकशी लावावी.
– अझहरचा खुबा उपसला आहे. याची सगळी चौकशी करा.
– माझी जेल बदली करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Exit mobile version