Download App

Santosh Deshmukh Case : बीड हत्येप्रकरणी पंधराशे पानांचं आरोपपत्र दाखल, चार्जशीटमध्ये नेमकं काय?

संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र (Santosh Deshmukh Case Chargesheet) न्यायालयात दाखल करण्यात आलं.

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आहेत. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली. संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र (Santosh Deshmukh Case Chargesheet) न्यायालयात दाखल करण्यात आलं. आरोपपत्र दाखल करताना सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली आणि एसआयटी प्रमुख किरण पाटील न्यायालयात उपस्थित होते.

छावाने सादर केली कणा! मराठी राजभाषा दिनानिमित्त विकी कौशलने वाचली कविता 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं राज्यात खळबळ उडाली होती. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात होती. आता चार्जशीट दाखल झाल्यामुळं आरोपींना मदत करणाऱ्यांचा पर्दाफाश होईल, असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता सरपंच देशमुख हत्येचा खटला न्यायायलात चालणार असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खटला लढवणार आहेत. आरोपपत्र दाखल करून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे मोठं पाऊल टाकण्यात आलंय.

कितीही डुबक्या मारा, गद्दारीचा शिक्का पुसल्या जाणार नाही, उद्धव ठाकरेंचा DCM शिंदेंवर हल्लाबोल 

आरोपपत्रात काय-काय उलगडा होणार?
– सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला त्याचे पुरावे या आरोपपत्रात असणार आहेत. या हत्याकांडात कोणाकोणाचा सहभाग आहे याबाबतच्या तपासाची माहिती आरोपपत्रात असल्याची माहिती आहे.

– खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहभाग आहे का, याचा तपास समोर येणार.

– खंडणी प्रकरणानंतर अॅट्रोसिटी प्रकरण आणि त्यानंतर हत्या प्रकरण या तिन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा उलगडा होईल.

– या प्रकरणातील आरोपींना फरार होण्यात कोणी मदत केली, आरोपी फरार झाल्यानंतर आरोपी कुठं होते, यासंदर्भातील ही सत्य दोषारोप पत्रातून समोर येणार.

– सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी वापरलेले शस्त्र आणि हत्या नेमकी कशी पद्धतीने झाली, याचेही सत्य समोर येणार.

– काही पोलिस अधिकाऱ्यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केला का आणि ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी आहेत का? याचेही सत्य सीआयडीच्या तपासातूनही समोर येईल.

– या प्रकरणाशी संबंधित असलेल्या कुणाकुणाची चौकशी झाली, हे देखील आरोपपत्रातून उघड होईल.

– खंडणी प्रकरणातून वाल्मिकी कराडने मिळवलेल्या संपत्ती संदर्भातील माहितीही समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरोपत्र दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी गृहमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. मकोका, हत्या, खंडणी, अॅट्रोसिटी अशा सर्व प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. जर ९० दिवसांच्या आत गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल झालं नाही तर संबंधित आरोपी जामिनास पात्र ठरतो. पण बीड प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांना जामिनाचा पर्यायही दिला नाही, असे सुरेश धस म्हणाले.

follow us