छावाने सादर केली कणा! मराठी राजभाषा दिनानिमित्त विकी कौशलने वाचली कविता

Vicky Kaushal Read marathi poem in Raj Thackery Program : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त अभिजात पुस्तक प्रदर्शन सोहळा आयोजित केला होता. यावेळी विविध भाषा क्षेत्रातील विशेषतः मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी मराठीमध्ये काव्यवाचन केलं.
कितीही डुबक्या मारा, गद्दारीचा शिक्का पुसल्या जाणार नाही, उद्धव ठाकरेंचा DCM शिंदेंवर हल्लाबोल
यावेळी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल यांनी देखील ज्या कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. त्यांची मराठीतील प्रसिद्ध कविता कणा सादर केली.
एम डी फाउंडेशनकडून वृक्ष लागवड आणि रक्तदान शिबिर; 30 वर्षांपासूनची परंपरा कायम
तसेच ही कविता सादर करण्यापूर्वी विकी कौशल्य आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, मी मराठी बोलू शकतो. कारण मी मराठी नसलो. तरी माझा जन्म महाराष्ट्रात झाला, माझं दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीत झाले. तसेच राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला मला आमंत्रित करून मला सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद.
तसेच राज ठाकरे यांनी मला जेव्हा मराठीत कव्यवाचन करण्यासाठी सांगितले. त्यावेळी मी त्यांना विचारलं की, कोणती कविता वाचायची आहे. त्यावेळी ते म्हणाले की, कणा तेव्हा मी त्यांना कणा या शब्दाचा अर्थ विचारला जेव्हा कणा या शब्दाचा इंग्रजीतील अर्थ कळाला की, स्पाइन तेव्हा मला लक्षात आलं की, नुकत्याच मी केलेल्या छावा या चित्रपटानंतर मला या शब्दाचा अर्थ अत्यंत चांगल्या पद्धतीने समजला. असं म्हणत त्यानंतर विकिने कणाही कविता अत्यंत अस्कलित मराठीमध्ये वाचून दाखवले.