Download App

जरांगे पाटलांची औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत घातपात होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्या धक्क्याने अनेकजण घाबरले आहेत. आता जरांगे पाटील आक्रमक पवित्रा घेतला आहे. पण त्यांना दिलेले औषध किंवा ज्यूस आधी तपासावे आणि मगच त्यांना द्यावे. सरकार त्यांची व्यवस्था करेल अशी मला आशा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

जरांगे पाटील यांनी निजामी मराठ्यांना आव्हान दिलेले आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. जरांगेच्या आंदोलनामुळे मोठी राजकीय उलथापालथ होणार हे मला स्पष्टपणे दिसत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Shivajirao Aadhalrao Patil यांच्या राजकीय ताकदीला बूस्टर; पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड

पुढं बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई राजकीयदृष्ट्या लढली पाहिजे. कुणबी दाखल्यासंदर्भातील मागणी मान्य झाल्याचे दिसत आहे. आता राहिला प्रश्न गरीब मराठ्यांचा. पण तो प्रश्न शिंदे आयोगावर अवलंबून असल्याचे सरकार सांगत आहे.20 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.विशेष अधिवेशनाचा मसुदा काय आहे हे सरकारने अद्याप सादर केले नाही. त्यामुळे हा गरीब मराठ्यांचा प्रश्न आहे की नाही हे कळायला मार्ग नाही, असे आंबेडकर म्हणाले.

NCP Crises : अजितदादांचा राग पण कोल्हे थेट लंकेंच्या मंचावर झळकणार, लोकसभेपूर्वीच लंकेंचे ‘महानाट्य’

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार यांच्या नावाने अनेक संघटना सुरू झाल्या, पण त्या निजामी मराठ्यांनी उद्ध्वस्त केल्या. जरांगे यांनी एवढंत सांगतो की फक्त 20 दिवसांच्या आत आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता आल्यानंतर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असा आँबेडकरांनी मनोज जरांगे यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.

नरेंद्र मोदी लबाडांचे सरदार, 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

follow us