Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil)आपलं आंदोलन मागे घेतलं. आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतची वेळ दिली. मात्र, साखळी उपोषण साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगिलतं. जरागेंची मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत, अशी मागणी आहे. त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला होता. यावरून जरांगे आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. आता जरांगे रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावर भुजबळांनी भाष्य केलं.
निलेश राणेंनी लोकसभेच्या रिंगणात उभं राहावं, मग पराभव दाखवतो; विनायक राऊतांचं आव्हानं
राज्य सरकारच्या मध्यस्थीनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, त्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या छगन भुजबळही संभाजीनगरमध्येच आहेत. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन जरांगे पाटलाची भेट घेतील, अशी शक्यता होती. मात्र, माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, मी जरांगे पाटील यांना भेटायला जाणार नाही. ते आता बरे आहेत. डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत, ते लवकर बरे व्हावेत, ही माझी शुभेच्छा, असं भुजबळ म्हणाले.
जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना 30 तारखेला आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरांवर दगडफेक करून त्यांची घरे जाळण्यात आली. याविषयी विचारलं असता भुजबळ म्हणाले की, मी बीडला जाऊन या नेत्यांना भेटणार आहे. सुभाष राऊत माझे समर्थक होते आणि आहेत, जयदत्त अण्णाही माझे खास मित्र आहेत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले, संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. प्रकाश सोळंके हे देखील राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांचं घरदार जाळल्यानंतर त्यांना घरी जाऊन पाहिलं तर पाहिजे, त्यासाठी मी जातोय, असं भुजबळ म्हणाले.
राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे का, असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. तेव्ही ते म्हणाले की, मी उद्या बीडला जाऊन आल्यानंतर बघतो काय झालं ते. भीतीचं वातावरण आहे की, कसं वातावरण आहे, यचावर उद्या सविस्तर बोलेन, असं ते म्हणाले.
दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी ठणठणीत आहे. काळजी करू नका, डॉक्टरांनी मला ठणठणीत बरं केलं. आता आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही. आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौैरा करणार असल्याचंही ते म्हणाले.