निलेश राणेंनी लोकसभेच्या रिंगणात उभं राहावं, मग पराभव दाखवतो; विनायक राऊतांचं आव्हानं
Vinayak Raut On Nilesh Rane : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी २४ ऑक्टोबर रोजी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी फडफडकी निवृत्तीची घोषणा केल्यानं राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपली निवृत्ती मागे घेतली. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
World Cup 2023 : भारताचा सलग आठवा ‘विराट’ विजय, दक्षिण आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा !
निलेश राणे यांनी राजकीय निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. मग, पराभव काय असतो, ते दाखवतो, असं आव्हान राऊतांनी दिलं. ते माध्यमांशी बोलत होते.
निलेश राणे हे माजी खासदार आहेत. ते २००९ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी खासदार झाले होते. मात्र, पुढं राजकीय परिस्थिती बदलली. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊताना राणेंचा 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव केला होता. राऊत यांचा पराभव केल्याशिवाय आपण दाढी करणार नसल्याची प्रतिज्ञादेखील निलेश राणे यांनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी केली होती.
दरम्यान, आता विनायक राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजकीय नाटक कसं करायचं, हे राणे कुटुंबाकडून शिकून घ्यावं. एकीकडे नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारले आहे. तर दुसरीकडे नितेश राणेंनी निलेश राणेंना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोकण दौऱ्यावर आले असताना निलेश राणेंना कुठं स्थान मिळालं, हे सर्व लोकांनी पाहिलं आहे.
फडणवीस यांनी सांगितल्याने निलेश राणेंनी वळवळ चालू केली आहे. पण, ही फार दिवस चालणार नाही. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. मग पराभव काय असतो, ते दाखवतो, असं आव्हान राऊतांनी दिलं.
काय म्हणाले निलेश राणे?
निलेश राणे यांनी एक्स अकाऊंटवरून निवृत्ती जाहीर केली होती. “नमस्कार, मी सक्रिय राजकारणापासून कायमचा दूर होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही. इतर काही कारण नाहही. मागील 19/20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. कारण नसतांना माझ्या सोबत राहिलात. त्याबद्दल मी आपला खूप ऋणी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम मिळालं. भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी खूप नशीबवान आहे, असं राणे म्हणाले होते.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मला पुन्हा एकदा उमेदवारी या लोकसभा मतदारसंघातून दिली तर अधिकाधिक मताधिक्याने माझा विजय होईल, असंही राऊत म्हणाले. सव्वादोन लाख मतांनी जिंकून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.