Download App

औरंगाबादचं नाव सरकार दरबारी बदलू नका; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Chhatrapati Sambhaji Nagar Court Order : नामांतराबाबत अंतिम अधिसूचना येत नाही, तोपर्यंत औरंगाबादचं (Aurangabad)नाव सरकारी दस्ताऐवजांवर बदलू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)दिले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावर आज मुंबई उच्च न्यायालयात अत्यंत महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. याची पुढील सुनावणी 7 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

औरंगाबादचं नाव सरकार दरबारी बदलू नका; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

औरंगाबाद आणि उस्मानाबाद (Osmanabad)या दोन शहरांची नावं काही दिवसांपूर्वी बदण्या आली. या शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज औरंगाबाद शहराच्या नामांतराविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

यावेळी मुस्लीम बहुल विभागांमधील नावं तातडीनं बदण्याची मोहीम हाती घेतल्याचा याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे. औरंगाबादच्या नामांतराबाबतची अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्ताऐवजांवर बदलू नका असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर नामांतराच्या याचिकेवरील सुनावणी येत्या 7 जूनपर्यंत तहकूबही करण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर भाजप, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, मनसे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला होता. नामांतरानंतर शहरात ठिकठिकाणी ढोल ताशे वाजवत, पेढे भरवून जल्लोष साजरा केला होता. मात्र त्यानंतर या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली अन् न्यायालयाने औरंगाबादचे नाव सरकार दरबारी बदलू नका, असे आदेश दिले आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज