‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात 12 वाजताच पहिला मृत्यू तरीही कार्यक्रम सुरुच ठेवला…

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात 12 वाजताच पहिला मृत्यू तरीही कार्यक्रम सुरुच ठेवला…

खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू 12 वाजता झाला तरीही कार्यक्रम सुरुच ठेवल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. मुंबईतील टिळक भवनात आज नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच हिंमत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा, असं खुलं आव्हान नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं आहे. तसेच भाजपविरोधात लढण्यासाठी जे बरोबर येतील त्यांना घेऊन लढणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

नाना पटोले म्हणाले, खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू 12 वाजता झाला तरीही कार्यक्रम सुरुच ठेवला होता. एवढा मोठा प्रकार घडूनही सरकारचे मंत्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच वेळ दिली होती, असा आरोप करुन त्यांना दोषी ठरवत असल्याचं ते म्हणाले आहेत. या सरकारला जनाचा नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आम्ही मागणी केली होती पण सरकारने एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली. हा केवळ धुळफेक करण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंहविरोधात पहिलवानांचं उपोषण, समर्थनार्थ आप उतरलं मैदानात

तसेच कोणाला काय वाटतं, कोणाच्या मनात काय, हा आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पक्षांना बरोबर घेऊन लढत आहोत, त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात पण देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, देश विकून देश चालवला जातोय त्यामुळे आम्ही संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना घेऊन भाजपविरोधात लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Pune News : अश्लील रॅप साँगवरून वातावरण तापलं; ABVP कडून विद्यापीठात तोडफोड आंदोलन

खारघर घटनेवर शिंदे सरकार सत्य लपवत आहे. सरकारकडून मृतांचा आकडाही जाहीर केला जात नाही. या घटनेप्रकरणी सरकारला जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आम्ही मागणी केली, पण सरकारने एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू 12 वाजता झाला तरीही कार्यक्रम सुरुच ठेवला होता. एवढा मोठा प्रकार घडूनही सरकारचे मंत्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच वेळ दिली होती, असा आरोप करुन त्यांना दोषी ठरवत आहेत. या सरकारला जनाचा नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आम्ही मागणी केली होती पण सरकारने एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली. हा केवळ धुळफेक करण्याचा प्रकार असून सरकारमध्ये हिम्मत असेल तर उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून खारघर घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केलीय, या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेला कळावे यासाठी प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन शिंदे-फडणवीस सरकारची पोलखोल केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

यासोबत नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. पटोले म्हणाले, मोदी सरकार उद्योगपती अदानीवर मेहरबान आहे हे काही लपून राहिलेले नाही. आता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरणावर अदानी कंपनीला जीएसटी माफ करण्यात आलेला आहे. मोदी सरकार गोरगरिबांची लूटमार करते पण अदानीला जीएसटी माफ करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube