Download App

Chhota Pudhari; पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांना दोन हजाराच्या नोटेचा झटका

Chhota Pudhari on 2000 Rupee note : आरबीआयने 30 सप्टेंबर दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत असून महाराष्ट्राचा छोटा पुढारी (Chhota Pudhari) म्हणजे घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) यानेही प्रतिक्रियी दिली आहे. दोन हजारच्या नोटबंदीने सामान्यांना हसूही नाही अन् रडूही नाही, असे त्याने म्हटले आहे.

घनश्याम दराडे म्हणाला की नोटबंदीने सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. कारण मागील नोटबंदीनंतर सामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास एक वर्ष गेले. आता दोन हजाराची नोटबंद केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजेत. कारण दोन हजारांची नोट सर्वसामन्यांच्या खिशाला परवडणारी नव्हती. एकतर दोन हजाराची नोट गरीबाकडे येतच नव्हती आणि आलीतर ती खर्च करु वाटत नव्हती. सर्वसामन्य माणसांकडे दोन हजारांची नोट नसणार आणि त्यामुळे त्यांच्यावर याचा काही परिणाम होणार नाही, असे घनश्याम दराडे याने म्हटले आहे.

2000 Rupees Note : बँकेत जाण्याची गरज नाही; ‘या’ ठिकाणी नोटा बदलून घेता येणार!

घनश्याम दराडे पुढं म्हणाला की आता यामध्ये भिती कोणाला आहे तर जे 2024 ला पैशाच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार होते अशा लोकांना दोन हजारांचा झटका बसणार आहे. पण सरकारने नवीन नोट मार्केटमध्ये आणली पाहिजे. कारण मार्केटमधील चलन सुरु राहिले पाहिजे. आर्थिक मंदी येऊ येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मागील नोटबंदीसारखी परिस्थिती होणार नाही याची सरकारने खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला दराडे यांने सरकारला दिली आहे.

दोन हजारची नोट बंद झाल्यामुळे तुमच्या बँक ठेवीच्या व्याजदरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या…

दोन हजाराची नोट आल्यापासून माझ्याकडे फक्त एकदाच नोट आली होती. दोन हजाराची नोट ठराविक लोकांनी बघितली असले, असे घनश्याम दराडे म्हणाला. तो पुढं म्हणाला की सरकारला मतांची गरज असेल तर विकासावर लक्ष दिलं पाहिजे. जनतेकडे दुर्लक्ष झालं तर मतदानातून जनता धडा शिकवते. नोटबंदीकरुन कोणाचे पोट भरणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे.

Tags

follow us