2000 Rupees Note : बँकेत जाण्याची गरज नाही; ‘या’ ठिकाणी नोटा बदलून घेता येणार!

2000 Rupees Note : बँकेत जाण्याची गरज नाही; ‘या’ ठिकाणी नोटा बदलून घेता येणार!

2000 Rupees Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन हजार रुपयांची नोट चलनातून (Note currency)बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या नोटा आता चलनात येणार नाहीत आणि तुम्हाला बँक (Bank)किंवा एटीएममधून (ATM) दोन हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. आरबीआयने 19 मे रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. तूर्तास, आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत दोन हजारच्या नोटा जमा करण्यास सांगितले आहे.

The Kerala Story च्या स्पेशल स्क्रीनिंगविरोधात FTII मध्ये विद्यार्थी आक्रमक

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही एकावेळी 10 पेक्षा जास्त नोटा बदलू शकत नाही. म्हणजेच, एकूण रक्कम 20 हजार रुपये फक्त एकावेळी बदलता येणार आहे. मात्र, एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बँकेव्यतिरिक्त बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरवर या नोटा बदलल्या जाऊ शकतात.

बिझनेस करस्पॉन्डंट सेंटर्स म्हणजे काय?
ही केंद्रं सहसा ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये बांधली जातात. 2006 मध्ये, रिझर्व्ह बँकेने बिगर-बँक मध्यस्थ जसे की, बिझनेस करस्पॉन्डंट किंवा बिझनेस फॅसिलिटेटर्स (Business Facilitators)वापरण्याची परवानगी दिली. या निर्णयामुळे बँकिंग आणि वित्तीय सेवांची व्याप्ती वाढवणे हा रिझर्व्ह बँकेचा उद्देश होता. बिझनेस करस्पॉन्डंट बँकेसारखी कामं करतात. ते ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना बँक खाती उघडण्यास मदत करतात. छोटे-मोठे व्यवहारही तिथे होतात.

यातही एक अडचण आहे. जेव्हा तुम्ही बँकेत जाता तेव्हा तुम्ही एकावेळी दोन हजारांच्या दहाच नोटा जमा करु शकणार आहेत. त्याचवेळी, तुम्ही बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरमधून एका दिवसात फक्त दोनच नोटा बदलता येणार आहेत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे बिझनेस करस्पॉन्डंटसोबत नोटा बदलण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. त्याचवेळी, बँकेतून पैसे अदलाबदल करण्यासाठी तुम्हाला बँक खात्याची आवश्यकता असणार नाही.

सात वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्रातील मोदी सरकारने अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यामुळे काळा पैसा आणि दहशतवादी फंडिंग थांबेल, असं त्यांनी सांगितलं होतं. जुन्या नोटांच्या बदल्यात 500 आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा आणल्या होत्या. अनेक दिवसांपासून दोन हजारांच्या नोटा छापल्या जात नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

नोटा ‘या’ ठिकाणी बदलता येतील?
आरबीआयच्या 19 प्रादेशिक शाखांमध्येही नोटा बदलल्या जाऊ शकतात. RBI ची देशभरात 31 ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा अहमदाबाद, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरममध्ये बदलता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच बँक ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा देणार नाही.

गेल्या वर्षी (नोव्हेंबर 2022), RBI ने दोन वर्षांहून अधिक काळ दोन हजार रुपयांच्या नोटा छापल्या नाहीत, अशी माहिती RTI मधून मिळाली होती. इकॉनॉमिक टाईम्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2016-17 किंवा आर्थिक वर्षात 354 कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा छापल्या गेल्याचे RTI मध्ये सांगितले. त्यानंतर त्याची छपाई झपाट्याने कमी झाली. पुढच्या वर्षी फक्त 11 कोटी रुपये आणि त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2018-19 मध्ये फक्त 4.5 कोटी रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या. यानंतर दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube