Cockroach Janta Party (CJP) New New announcement : दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janta Party) संभाजीनगरमध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ या विषयाने दौरा करणार असल्याचे सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनी जाहीर केले आहे.
एकनाथ शिंदे किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? 25-30 आमदार पाडणार; मनोज जरांगे भडकले
संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील रणनितीचा माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. अभिजित दीपके म्हणाले, आज शिक्षण आणि लोकांच्या मूळ मुद्द्यावर कुणीच बोलायला तयार नाही. त्यामुळं आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. या सगळ्या दौऱ्यात आमचा महत्वाचा मुद्दा असणार आहे शिक्षण. आज शाळा आणि कॉलेजेसच्या फी पहिल्या तर गरिबांना शिक्षण घेणं कठीण झालं आहे. त्यामुळं शिक्षणात आणि शिक्षण व्यवस्थेत मूळ बदल हे आमचं धोरण आहे. अलीकडच्या काळात शिक्षणाचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळं आज यामध्ये काम होणं गरजेचं आहे.
‘नो इन्शुरन्स, तर नो पेट्रोल’ पण, गाडीचा विमा आहे की नाही सरकारला कळणार कसं?
जंतरमंतरवर फक्त विद्यार्थी नव्हते, तर असंख्य बेरोजगारही होते. अनेकांना आजही पदव्या घेऊन रोजगार नाही. ते झोमॅटोसारखे जॉब करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळं शिक्षण आणि बेरोजगारीचा मुद्दा आता टाळून जमणार नाही. त्याकडं लक्षच द्यावं लागेल असंही सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके म्हणाले.
आज ज्यांच्याकडे पदवी नाही ते सरकार चालवतायेत-दीपके
आज ज्यांच्याकडे पदवी नाही ते सरकार चालवतायेत. त्यामुळं या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जर आज एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणतोय की मी सगळी व्यवस्था बदलून टाकेल तर तो खोट बोलतोय, जस 2014 ला एक व्यक्ती खोटं बोलून सत्तेत आली असं म्हणत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
