Download App

बीडसाठी बैठकांचे सत्र, सभेचे आयोजन, प्रवेशाचा सपाटा : शरद पवारांच्या सभेनंतर अजितदादा अलर्ट

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बीड येथे सभा नुकतीच पार पडली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) बीडसाठी अलर्ट झाले आहेत. बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात आज (24 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. या बैठकीला बीडमधील अजितदादांच्या गटातील सर्व आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय येत्या 27 ऑगस्टला अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभाही पार पडणार आहे. (DCM Ajit Pawar took meeting for Beed district pending work with ex and current MLA)

बीडसाठी बैठकांचे सत्र :

बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा आणि महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकरण या प्रलंबित प्रश्नांविषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अजितदादा पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या सर्वांनीच बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांसह अन्य प्रस्तावित व तातडीची कामे तसेच दुष्काळी परिस्थिती संदर्भात माहिती दिली.

Sharad Pawar : शरद पवारांचा फोटो वापरू नका; अजितदादा गटाची कार्यकर्त्यांना तंबी

यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचे अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत. दरम्यान धनंजय मुंडेंच्या दालनात महापारेषण व संचालन विभागाकडील प्रलंबित विषयासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्याही बैठकीस बीड जिल्ह्यातील आजी, माजी आमदार व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. माजलगाव धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्रास पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात देखील धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

बीडमध्ये सभेचे आयोजन :

येत्या 27 ऑगस्टपासून अजित पवार यांच्या गटाच्या वतीने महाराष्ट्र परिक्रमा यात्रा काढण्यात येणार आहे. बीडमधून या यात्रेची सुरुवात होणार असून या निमित्ताने अजित पवार यांची सभाही होणार आहे. महाराष्ट्र परिक्रमा यात्रेसोबत ‘संत आपुले दारी’ यात्राही वारकरी अध्यात्मिक आघाडीच्या वतीने यात्रा काढण्यात येणार आहे. तुकाराम महाराजांचे विचार या यात्रेच्या माध्यमातून गावागावात पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीने करण्यात येणार आहे.

Beed : संदीप क्षीरसागरांविरोधात अजितदादांनी मिळाला पर्याय; थेट भावालाचा लावलं गळाला

बीडमध्ये अजितदादांना मिळाला तरुण चेहरा :

दरम्यान, बीडमधील सभेपूर्वी पक्षप्रवेशाचाही सपाटा सुरु आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अजित पवार यांना बीडमध्ये पर्याय सापडला आहे. संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ आणि बीड नगरपालिकेचे माजी सदस्य डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काल (23 ऑगस्ट) राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. योगेश क्षीरसागर हे बीडचे जवळपास 35 वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. स्वतः योगेश हेही बीडच्या नगरपालिकेचे सदस्य राहिलेले आहेत.

Tags

follow us