Beed : संदीप क्षीरसागरांविरोधात अजितदादांनी मिळाला पर्याय; थेट भावालाचा लावलं गळाला

Beed : संदीप क्षीरसागरांविरोधात अजितदादांनी मिळाला पर्याय; थेट भावालाचा लावलं गळाला

बीड : जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पर्याय सापडला आहे. संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ आणि बीड नगरपालिकेचे माजी सदस्य डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आज (23 ऑगस्ट) राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी योगेश क्षीरसागर यांच्या आजी, माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांची आवर्जून आठवण काढली. (Cousin of Sandeep Kshirsagar and former member of Beed Municipality Dr. Yogesh Kshirsagar joined NCP Ajit Pawar group)

कोण आहेत योगेश क्षीरसागर?

योगेश क्षीरसागर हे बीडचे जवळपास 35 वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. स्वतः योगेश हेही बीडच्या नगरपालिकेचे सदस्य राहिलेले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांचे ते चुलत भाऊ आहेत. संदीप आणि योगेश हे दोघे चुलत भाऊ असले तरीही दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही.

याबाबत स्वतः योगेश क्षीरसागर यांनी सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते,”घर म्हणून आम्ही एकत्र असलो तरी आमचे परस्पर काहीच संबंध नाहीत. कुटुंब असल्यामुळे एका छताखाली राहतो. परंतु, एकमेकांसोबत कधी बोलतही नाही. एवढंच नाही तर आम्ही एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

योगेश क्षीरसागर यांच्या प्रवेशानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, योगेश भैय्या यांच्या माध्यमातून चांगले नेतृत्व पुढे आलं आहे. पण योगेश यांचा प्रवेश हा तसा प्रवेश म्हणता येत नाही. कारण आजचा प्रवेश नाही तर घरवापसी आहे. 27 तारखेला अजित पवारांच्या नेतृत्वात जाहीर सभा बीड येथे होणार आहे. त्या, सभेच्या काही दिवस अगोदर मुंबईमध्ये योगेश यांच्या प्रवेश व्हावा त्यांच्या कुटुंबाची भूमिका होती.

योगेश यांच्यानिमित्ताने आता योग्य माणसाला ताकद देत आहोत, असं म्हणतं त्यांनी संदीप क्षीरसागर यांना टोला लगावला. काही गोष्टी घडू घडल्या, त्यामुळे पक्षातून त्यांना बाहेर जावे लागले मात्र, आज पुन्हा त्यांची घरवापसी झाली आहे. आज येथे उपस्थित असलेली सर्व माणसे दादांच्या पाठीमागे एकसंघ उभी राहिली. बीड जिल्ह्यातील , कमतरता योगेश भैयांनी भरून काढली. अजित पवार यांच्या पाठीमागे ताकत उभा करण्यासाठी जे काही पणाला लागेल ते मी मोकळेपणाने खर्च करेल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

कोण कोण आहे क्षीरसागर कुटुंबात?

केशरकाकू क्षीरसागर यांना चार मुले आहेत. जयदत्त क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. विठ्ठल क्षीरसागर अशी या सर्वांची नावं. यातील डॉ. विठ्ठल क्षीरसागर राजकारणापासून लांब राहिले. तर, जयदत्त क्षीरसागर यांना दोन मुलं असून, रोहित क्षीरसागर आणि हर्षद क्षीरसागर अशी त्यांची नावं आहेत. रविंद्र क्षीरसागर यांना तीन मुलं. यात संदीप क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर अशी तिघांची नावं. डॉ. भारतभूषण यांना एकच मुलगा असून, योगेश क्षीरसागर असं त्यांचं नावं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube