Sharad Pawar : शरद पवारांचा फोटो वापरू नका; अजितदादा गटाची कार्यकर्त्यांना तंबी

Sharad Pawar : शरद पवारांचा फोटो वापरू नका; अजितदादा गटाची कार्यकर्त्यांना तंबी

Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बॅनर, पोस्टरवर माझा फोटो वापरला तर (Sharad Pawar) थेट कोर्टात खेचेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी अजित पवार गटाला दिला होता. या इशाऱ्यानंतरही अजितदादा गटाचे कार्यकर्ते, नेते उत्साहाच्या भरात बॅनरवर शरद पवार यांचे फोटो लावतच होते. आता मात्र, अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटातील वरिष्ठ नेत्यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. शरद पवार यांचा फोटो कुणीही वापरू नये, अशा सूचनाच वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

कार्यकर्त्यांवर कोर्टात जाण्याची वेळ येऊ नये यासाठीच या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. योगेश क्षीरसागर यांनी काल अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी स्टेजवर जो बॅनर होता त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो नव्हता. बीडच्या सभेचा अजित पवार गटाचा टीजर आला त्यातही शरद पवारांचा फोटो नव्हता.

अजितदादांचे शिलेदार काही ऐकेनात; आता पवार-मोदींच्याच बॅनरची शिर्डीत ‘हवा

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही नेते पदाधिकारी अजित पवार गटात गेले आहेत. तर काही नेते आणि कार्यकर्ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच बरोबर आहेत. मात्र, तरीही नेते आणि कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांनाच दैवत मानत आहेत. त्यामुळे अजित पवार गटाचा कोणताही कार्यक्रम किंवा सभा असो तेथील फलक आणि बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो असतोच. शरद पवार यांनी फोटो वापरला तर कोर्टात खेचण्याचा इशारा दिल्यानंतर अजितदादांचे शिलेदार काही ऐकत नव्हते. त्यांच्याकडून शरद पवारांच्या फोटोचा वापर सुरुच होता.

या अतिउत्साहामुळे कदाचित अडचणी निर्माण होऊ शकतात. कार्यकर्त्यांनाच कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भविष्यातील त्रास टाळण्याच्या उद्देशाने वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो बॅनरवर वापरू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांनंतर त्याचा परिणामही दिसू लागल आहे. अजित पवारांच्या गटातील नेत्यांकडून आता शरद पवारांचे फोटो टाळले जात आहेत.

भाजपचा तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्लॅन; इंडिया बैठकीआधी सुळेंचा गौप्यस्फोट!

शरद पवार हेच आमचे दैवत – पटेल

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार (Sharad Pawar) हेच आमचे दैवत असल्याचे म्हटले आहे. मी पवार साहेबांना सदैव मानणाार माणूस आहे. आजही आणि उद्याही मी त्यांनाच मानणार आहे. पवार साहेबांबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. पवारांबद्दल ना विरोधात बोललं पाहिजे ना त्यांच्या विरोधात ऐकलं पाहिजे. त्यांच्याबाबत कुठलीही चर्चा करू नका. कुणी काही चर्चा करत असतील तर त्यांना तिथेच थांबवले पाहिजे, असे पटेल म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube