भाजपचा तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्लॅन; इंडिया बैठकीआधी सुळेंचा गौप्यस्फोट!

भाजपचा तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्लॅन; इंडिया बैठकीआधी सुळेंचा गौप्यस्फोट!

Supriya Sule : देशभरातील इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी देशातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीची जोरदार तयारी राज्यातील विरोधी पक्षांकडून सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. राष्ट्रवादी फोडण्याचा हा भाजपाचा पहिला प्रयत्न नाही. याआधीही त्यांनी तिनदा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला होता. दोन वेळेला त्यांना अपयश आलं. तिसऱ्या वेळेला मात्र तगडी रणनीती आखली आणि अजित पवार यांच्यासोपबत सत्तेत सहभागी झाले, असे सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

‘कामगारांच्या खिचडीचोराला बावनकुळेंचं महत्व कळणार नाहीच’; राणेंचा राऊतांवर घणाघात

आमचा पक्ष फुटलेला नाही. एक गट सत्तेत आहे तर एक गट विरोधात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवरही त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादी फोडण्याचे प्रयत्न अनेक वेळेला झाले. दोन वेळेला भाजपला अपयश आलं, तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी साध्य केलं. त्यांना काहीही करून सत्तेत यायचं आहे.  साम दाम दंड भेद असे फडणवीसांनी आधी म्हटलेच होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.

मला माहिती आहे की माझ्या बारामती मतदारसंघात आव्हाने निर्माण केली जातील. भाजप नेते, मंत्री दर पंधरा दिवसांनी मतदारसंघांचा दौरा करत आहेत. ते आले तरी हरकत नाही. त्यांनी स्पर्धा करू द्या. शेवटी निर्णय जनतेच्याच हातात आहे.

अजितदादा परत येतील का? सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात दिलं उत्तर

राष्ट्रवादीत फूट नाही, शरद पवार पक्षाचे अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीच फूट नाही. एक गट सत्तेत आहे तर दुसरा गट विरोधात आहे. तांत्रिकदृष्ट्या पक्षात फूट पडलेली नाही. राज्यातील काही आमदारांनी पश्रश्रेष्ठींची परवानगी न घेता सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना कळवले आहे. आता आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यानुसार आम्हाला पुढे न्यायालयात जाण्याचा निर्णय घेता येईल, असेही सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube