Download App

“धनंजय मुंडे सहाच महिन्यांत आमदारकीचा राजीनामा देणार”, करुणा मुंडेंच्या दाव्याने खळबळ

जास्तीत जास्त किंवा त्याहून जास्त म्हटलं तर नऊ ते दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल.

Dhananjay Munde : घरगुती हिंसाचाराच्या आरोप प्रकरणात दोषी ठरवून पहिली पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना (Karuna Munde) देखभाल खर्च देण्याचे आदेश वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी धनंजय मुंडेंना दिला होता. या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सुनावणी होण्याआधीच करुणा मुंडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. सहा महिने किंवा जास्तीत जास्त नऊ महिन्यांत मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा होईल असा दावा करुणा शर्मा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मुंडे जास्तीत जास्त सहा महिन्यांत राजीनामा देतील या दाव्याचा पुनरुच्चार केला.

करुणा मुंडे पुढे म्हणाल्या, मी वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात मी मागणी केली होती की मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे आणि मला देखभालीचा खर्च मिळाला पाहिजे. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने सांगितल्यानंतर धनंजय मुंडे यांना आम्हाला दोन लाख रुपये द्यावेसे वाटत नाहीत. या ऑर्डरच्या विरोधात ते सेशन कोर्टात गेले आहेत.

धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होण्याबाबतची जी केस आहे ती छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात सुरू आहे. यावरही लवकरच सुनावणी होणार आहे. यासंदर्भात त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. यात जे खोटे अॅफेडेव्हिट त्यांनी दिले आहे त्या संदर्भातही मी परळी कोर्टात केस दाखल केली आहे.

मंत्रीपद तर गेलेच पण आमदारकीही..धनंजय मुंडेंबद्दल करुणा मुंडे यांचं मोठ विधान, काय म्हणाल्या?

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना पक्षातून काढून टाकलं होतं पण कालांतराने त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले मंत्रीपदही मिळाले. जर अशीच परिस्थिती धनंजय मुंडे यांच्याबाबतीत निर्माण झाली तर, असे विचारले असता करुणा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत धनंजय मुंडेंच्या बाबतीत असे होणार नाही. मी सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. वरिष्ठांना निवेदनेही दिली आहेत. जरी या राजकारणी लोकांनी सत्ताधारी लोकांनी दखल घेतली नाही तरी नियती तिचं काम करत आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या केसमध्ये असे कधीच होऊ देणार नाही.

जास्तीत जास्त किंवा त्याहून जास्त म्हटलं तर नऊ ते दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल. कारण आमची केस सोपी आहे आणि आमच्याकडे सर्व पुरावे देखील आहेत असे करुणा मुंडे यांनी सांगितले.

अजित पवारांवर माझा विश्वास नाही, ते धनंजय मुंडेंना वाचवत आहेत.. करुणा मुंडेंचा आरोप

follow us