Download App

Dhangar Reservation : चौंडीत उपोषण मागे पण जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

  • Written By: Last Updated:

Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अगोदर मराठा आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) लढा तीव्र झाला आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केल्यापासून राज्यात ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. त्यात आज जरांगे यांच्या जालन्यामध्येच धनगर मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. त्यात या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच दगडफेक केली.

थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच दगडफेक…

जालन्यामध्ये धनगर समाजाने अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचे होते. त्यावेळी या आंदोलकांचं निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी खाली देखील आले नाहीत त्यामुळे धनगर कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी गटवरूनच जिल्हाधिकारी कार्यालामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

>Tiger च्या तिन्ही चित्रपटांमुळे माझं करिअर… टायगर 3 निमित्त सलमानने व्यक्त केल्या भावना

त्याचबरोबर या आक्रमक झालेल्या आंदोलकांनी यावेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरच दगडफेक केली. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पोलिसांकडून आंदोलकांना प्रतिबंध घालत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी 11 वाजता हा मोर्चा काढण्यात आला होता.

‘पनौती’मुळे भारताचा पराभव; राहुल गांधींचा पीएम मोदींवर हल्लाबोल, भाजपकडून प्रत्युत्तर

शहरातील गांधी चमन येथे या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शनि मंदीर, उड्डाणपुल, नुतन वसाहत, अंबड चौफुली मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला होता. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. धनगर समाजाच्या नेत्यांनी त्यात भाषणं केली. त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचे होते. त्यावेळी या आंदोलकांचं निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी खाली देखील आले नाहीत. असा आरोप धनगर कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे ते आक्रमक झाले असं सांगण्यात येत आहे.

Dhangar Reservation : मोठी बातमी! राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, धनगर आरक्षणासाठीचं चौंडीतील उपोषण मागे

दरम्यान दुसरीकडे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाकडून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात आले होते. आज अखेर पाचव्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. उपोषणकर्ते व सरकार यांच्यात आमदार प्रा.राम शिंदे यांनी यशस्वी मध्यस्थी घडवून आणल्याने हे उपोषण पाचव्या दिवशी सुटले.

यशवंत सेनेने याआधी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे 21 दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी सरकारने लिखित आश्वासन दिले होते. परंतु, सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप करत यशवंत सेनेने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेले उपोषणाचे अंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Tags

follow us