Download App

आमदार शिंदेंच्या मतदारंसघात खासदार चिखलीकरांचचं वर्चस्व; बाजार समिती निवडणुकीत केलं चीतपट

नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मतदारसंघात खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोहा-कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर गटाने 18 पैकी 10 जागांवर आपला झेंडा फडकवला आहे. प्रताप पाटील चिखलीकरांचे मेहुणे असलेले शिंदे यांच्या गटाने 18 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अजूनही खासदार चिखलीकरांचं वर्चस्व असल्याचं पुन्हा एका स्पष्ट झालं आहे.

नांदेडमधून लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणारे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघात कंधार तालुका येत नाही, असं असतानाही कंधार बाजार समितीत चिखलीकरांच्या गटाला यश मिळालंय. त्यामुळे चिखलीकरांचीच ताकद या तालुक्यात असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत झालेला पराभव मेहुणे श्यामसुंदर शिंदेंना जिव्हारी लागला असल्याचं बोललं जात असून आगामी काळात शिंदे-चिखलीकरांमध्ये संघर्ष पेटणार असल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्रात तीन जनरल डायर! एक मुख्य तर, बाकी उप; राऊतांनी तोफ डागली

निवृत्तीनंतर श्यामसुंदर शिंदे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचदरम्यान, कंधार तालुक्यात प्रताप पाटील यांचे पुत्र प्रविणही इच्छूक होते. बहिणीमुळे प्रताप पाटलांना नमावं लागलं आणि निवडणुकीत त्यांनी मेहुण्याचा प्रचार केला. त्यानंतर निवडणुकीत श्यामसुंदर शिंदेंनी विजय मिळवला होता.

त्यानंतर दोन्ही कुटुंबात कटुता आली आणि दाजी-मेहुणे असलेले शिंदे-चिखलीकर वेगळे झाले. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निम्मित्ताने दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. विशेष म्हणजे चिखलीकर गटाकडून या निवडणुकीची सर्व धुरा प्रवीण पाटील यांनी खांद्यावर घेतली होती.

Tags

follow us