महाराष्ट्रात तीन जनरल डायर! एक मुख्य तर, बाकी उप; राऊतांनी तोफ डागली

  • Written By: Published:
महाराष्ट्रात तीन जनरल डायर! एक मुख्य तर, बाकी उप; राऊतांनी तोफ डागली

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आंदोलनादरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Jalna Sarathi Village Protest) गावात लाठीहल्ला करण्यात आला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणावरून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांवर तोफ डागली आहे. ज्या पद्धतीने अमानुष लाठीहल्ला करण्यात आला त्यावरून राज्यात एक नव्हे तर, तीन-तीन जनरल डायर असून, यातील एक मुख्य जनरल डायर तर, बाकी दोन उप जनरल डायर असल्याची बोचरी टीका केली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी अजितदादा कार्यक्रमांना गैरहजर; नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

सरकार ला तोंड आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत उपोषण उधळून लावण्याचे या सरकारने आदेश दिले. जो फोन आला तो मुख्यमंत्री कार्यालयातून होता की गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून होता? असा उलट प्रश्नदेखील राऊतांनी विचारला. लाठीहल्ला केला यात पोलिसांचा दोष नसून, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं यामध्ये हे सरकार पोलिसांचा बळी देत असल्याचे राऊत म्हणाले.

वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय पोलीस निरीक्षक, अतिरिक्त निरीक्षक हा निर्णय घेऊच शकत नाही. त्यांना आदेश नेमके कोणी दिले हे समोर येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये हजारो कार्यकर्ते येऊन जाब विचारु नये म्हणून मनोज जरांगे पाटील यांना चिरडून टाकलं. असे म्हणत महाराष्ट्रात जनरल डायर कोण? हे महाराष्ट्रात सर्वांना समजले आहे. जनरल डायरच्या मानसिकतेने राज्य चालू आहे.

Hemant Dhome: जालना लाठीचार्जवर मराठी अभिनेता संतापला; म्हणाला, ‘राजकारणासाठी सारं..’

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात जाऊन सांगितले की, सर्वोच्च न्यायलयाने लोकनियुक्त सरकारच्या अधिकाराबाबत दिल्ली विधानसभेचा निर्णय दिला. तो निर्णय फिरवण्यासाठी संसदेमध्ये घटना दुरुस्ती करण्यात आल्याचे राऊत म्हणाले. तुमच्या हातातून दिल्ली राज्याचे अधिकार जात होते म्हणून नवीन विधेयक आणि बिल आणले. सरकारचा आवाज दाबण्यासाठी संसदेत नवीन विधेयक आणता. रकार स्वत:च्या स्वार्थासाठी घटना दुरुस्ती करत आहे. महाराष्ट्रामध्ये एक समाज उपोषणाला बसलं आहे तिथे हल्ला करतात. मग त्यासंदर्भात घटना दुरुस्त करुन त्यांना न्याय का देत नाहीत?

…तर कुणाला पद्मभूषण, पद्मविभूषण अन् कोणाला भारतरत्न

यावेळी राऊतांनी अजित पवारांवरही तोफ डागली. ते म्हणाले की, ईडीने कालपर्यंत अजित पवार बाबत काय केलं? असे म्हणत त्यांच्यावर कालपर्यंत अजितदादांवर धाडी टाकल्या जात होत्या. गुन्हे दाखल केले जात होते. त्यानंतर जरंडेश्वर जप्ती आली आणि अचानक चार्जशिट मधून नाव गेले एवढेच नव्हे तर, गुन्हा मागे घेतला.

मराठा आरक्षणावर शरद पवारांची भूमिका दुटप्पी; भाजपने पवारांना घेरले !

हसन मुश्रीफ यांना आता महात्मा पदवी देत आहेत. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, किरीट सोमय्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण तर, कोणाला भारतरत्न देण्याची शिफारस केली जाईल. ज्यांनी दहा वीस हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असेल तर, त्यांना भारतरत्नदेखील देतील त्यांचा काय भरोसा नाही, असेही राऊतांनी यावेळी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube