मराठा आरक्षणावर शरद पवारांची भूमिका दुटप्पी; भाजपने पवारांना घेरले !
मुंबईः जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आहे. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. आता भाजपचे नेतेही फडणवीस यांची बाजू घेण्यासाठी शरद पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नागपूरमधील गोवारी घटनेचा आठवण शरद पवारांनी करून दिली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी राजीनामा का दिला नाही, असा सवाल बावनकुळेंचा आहे. तर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यासाठी थेट शरद पवारांच्या लोक माझे सांगाती आत्मचरित्राचा आधार उपाध्ये यांनी घेतला आहे.
पवार साहेबांच्या वाजत गाजत आलेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल….
मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत गेल्याचे मुद्दे त्यांनी पुस्तकात मांडले आहेत… या काळात ते सत्तेवरही होते. त्यावेळी मराठा समाजाला शांत करण्यासाठी… pic.twitter.com/AyML25Q0c6
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 3, 2023
पवारांच्या वाजत गाजत आलेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल. मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत गेल्याचे मुद्दे त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. या काळात ते सत्तेवरही होते. त्यावेळी मराठा समाजाला शांत करण्यासाठी त्यांनी काय केले? आरक्षणाला थेट कायदेशीर अडचणी होत्या. तर मराठा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पवारांनी काय प्रयत्न केले? असा सवालही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
तुषार दोशींच्या जागी आता शैलेश बलकवडे जालन्याचे नवे एसपी, तात्काळ स्वीकारला पदभार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बाजू घेताना उपाध्ये म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सारथी योजना सुरू केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरू केले. ज्यामुळे मराठा तरुण छोटे-मोठे व्यवसाय करू लागले. देवेंद्रजींनी स्वतः लक्ष घालून आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवले. पण पवार हे शिल्पकार असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे ते आरक्षण गेले. यावर पवारांना कधी कळवळा आला? पवार हे त्यांच्यात आत्मचरित्रात म्हणतात आरक्षण देण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरू शकतो. जी समाजाची गरज आहे, त्यात काय आले वादग्रस्त? म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, हीच त्यांची मूळ भूमिका दिसते, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.