आष्टी एसटी आगारातील विश्रांती कक्षात चालकाचा मृतदेह; 46 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ

Driver Commits Suicide at Ashti Bus Station : घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

News Photo   2026 09 12T155640.255

Driver Ansar Habib Shaikh commits suicide in the rest room at the Ashti ST depot

Driver Commits Suicide at Ashti Bus Station : आष्टी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात (Ashti) चालक म्हणून कार्यरत असलेल्या 46 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृतदेह शनिवारी (दि. 12) पहाटे बसस्थानकातील विश्रांती कक्षात आढळून आला. अन्सार हबीब शेख (रा. साबलखेड, ता. आष्टी) असे मृत चालकाचे नाव आहे. बसस्थानकाच्या आवारातच ही घटना घडल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्सार शेख हे 2010 पासून आष्टी आगारात चालक म्हणून सेवा बजावत होते. शुक्रवारी रात्री ते चालक व वाहकांसाठी असलेल्या विश्रांती कक्षात गेले होते. शनिवारी पहाटे नाशिक-तुळजापूर मार्गावरील बस आष्टी बसस्थानकात आल्यानंतर संबंधित चालक विश्रांती कक्षाजवळ गेला. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने त्याने वारंवार आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्याने संशय निर्माण झाला.

धक्कादायक! बीड नवगण राजुरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; तीन मित्रांचा जागीच मृत्यू

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता अन्सार शेख यांचा मृतदेह कक्षात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक तांबे, परमेश्वर तागड आणि विलास गुंडाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

अन्सार शेख यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक तणाव होता की अन्य काही कारण, याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने साबलखेड परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version