चालकाचे आधारकार्ड मिळवले अन मनोरमा ‘इंदूबाई’ झाल्या… पोलिसांना सापडल्या तरी कशा ?

चालकाचे आधारकार्ड मिळवले अन मनोरमा ‘इंदूबाई’ झाल्या… पोलिसांना सापडल्या तरी कशा ?

Manorama Khedkar : परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर नंतर (Pooja Khedkar) त्यांच्या मातोश्रींचेही अनेक कारनामे चर्चेत आहेत. पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धाक दाखवल्या प्रकरणी आधीच गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांना बेड्या ठोकण्यासाठी पोलीस मागावर होतेच. परंतु, त्यांना तुरी देण्याचा पूर्ण प्लॅन मनोरमा खेडकरांनी (Manorama Khedkar) आखला होता. त्यामुळेच तर गुन्हा दाखल होताच त्या पुण्यातून गायब झाल्या होत्या. पण, शेवटी त्यांच्याकडून अशी एक चूक घडली ज्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करण्यात यश मिळवले. पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यासाठी थेट महाड गाठले होते. येथून त्यांना अटक करण्यात आली.

खरं तर शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केल्या प्रकरणात पोलिसांनी मनोरमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या कारवाईत अटक होईल या भीतीने त्यांनी पलायन करणे योग्य मानले. यासाठी त्यांनी एक कॅब बूक केली. आता पोलिसांचा ससेमिरा कसा सोडविता येईल हाच विचार त्यांच्या डोक्यात होता. त्यांनी थेट महाड गाठलं. येथे एका हॉटेलमध्ये रुम बूक केली. पुणे ते महाड प्रवासा दरम्यान त्यांनी अत्यंत शिताफीने कॅब चालकाचे आधारकार्ड हस्तगत केले. या कार्डवरील चालकाच्या आईचे इंदूबाई हे नाव स्वतः धारण केले. आधारकार्डचा गैरवापर करत त्यांनी कॅबचालकाच्या आईचे नाव घेतले. या आधारकार्डच्या मदतीने हॉटेलमध्ये रुमही मिळवली.

Manorama Khedkar : मोठी बातमी! मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

आता मनोरमा खेडकर यांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मनोरमा खेडकर यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येत नव्हतं. त्यांचा मोबाइल बंद असल्याने ठावठिकाणाही मिळत नव्हता. तरीदेखील पोलिसांचे प्रयत्न सुरू होतेच. अखेर खेडकर यांच्याकडून एक चूक घडली आणि हीच चूक त्यांना अटकेपर्यंत घेऊन गेली. पोलिसांनी मनोरमा यांचा फोन सर्व्हिलान्सला लावला होता. 17 जुलैच्या रात्री 11 वाजता त्यांनी फोन चालू केला आणि लगेचच पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळाले. मग पहाटे साडेतीन वाजताच पोलिसांचे पथक लॉजच्या दारात हजर झाले.

दरम्यान, शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या फरार होते. मात्र आज महाडमधील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात त्या हलक्यात सुटणार नाहीत; पूजा खेडकर प्ररणावर विजय कुंभारांची सडेतोड मुलाखत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube