Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी उद्धव ठाकरेंच्या ( Uddhav Thackeray ) टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, सरडे रंग बदलतात मात्र एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला. त्यांनी महायुतीचे आणि शिंदे गटाचे छत्रपती संभाजी नगरचे लोकसभेचे उमेदवार संदिपान भूमरे यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
‘गंगेतून मथुराकरांना पेयजल’म्हणणाऱ्या हेमा मालिनीला तोंडावर पाडलं; ट्रोलर्सनी सुनावलंच!
या सभेत शिंदे यांनी जे उबाठा पंतप्रधान मोदींचे गुणगान गात होते. ते मी तुम्हाला ऐकवतो. असं म्हणत थेट उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणाऱ्या भाषणाची ऑडीओ क्लिप लावली. ज्यामध्ये ठाकरे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तत्कालीन भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.
एनएलसी इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 1 लाख रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज ?
त्यावर शिंदे म्हणाले की, हेच कौतुक करणारे लोक आता पंतप्रधान मोदींच्या नावाने खडे फोडत आहेत. सरडे रंग बदलतात मात्र एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला. बाप एक नंबरी आणि बेटा दस नंबरी. रोज माझ्यावर आरोप करत आहेत. पण मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. तो मुख्यमंत्री झालाय त्या दिवसापासून तुम्हाला पोटशुळ उठलय. त्यामुळे ते मला कधी मिंधे म्हणतात, कधी नीच म्हणतात, कधी निर्लज्ज म्हणतात. पण मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. त्यामुळे ही शिवी मला नाही. तर शेतकऱ्यांच्या मुलाला दिली जात आहे.
सांगली काँग्रेसनं का सोडली? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, तीन पक्षांच्या आघाडीत…
त्यामुळेच मी आरोपांना आरोपांनी उत्तर देत नाही. तसेच पोरा सोरांच्या आरोपांना तर मी उत्तर देतच नाही. बघतही नाही त्याकडे. तसेच या निवडणुकीमध्ये उबाठाला जनता घरी बसल्याशिवाय राहणार नाही. ही काळा दगडावरची भगवी रेघ आहे.