Losabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकांबद्दल अनेक तज्ञांनी आपली मत मांडली आहेत. यामध्ये काही तज्ञांच मत आहे या निवडणुकीत कुणाची लाट नव्हती. कशाची हवा नव्हती आणि कुणाच वारही नव्हत. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्याचा विचार केला तर कुठंच भाजपची हवा दिसली नाही असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. (Losabha Election) जर मराठवाड्यात (Marathwada) कुणाची हवा दिसली असेल तर ती उद्धव ठाकरे यांची असही बोललं जातय. इतकच नाही तर मराठवाड्यात ठाकरे यांच्या ज्या काही चार जागा आहेत त्या निवडून येतील असा दावाही केला जातोय. तसंच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणाला एक स्तर होता. त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये एकप्रकारची सहानूभुती दिसून आली. त्यामुळे उद्धव ठाकरे मराठवाड्यात चौकार मारणार असं ठाम मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे फॅक्टर दिसून आला. जालन्यातली अंतरवाली सराटी येथे आंदोलन केल्यामुळे जालना आणि बीड या दोन जिल्ह्यात जरांगे यांचा मोठा प्रभाव राहिला असं मतही तज्ञांनी मांडलं आहे. बीड जिल्ह्यात जातीय पातळीवर निवडणूक झाल्याने इथ टोकदार संघर्ष झाला. त्यामुळे बीड जिल्ह्यात काय निकाल लागेल हे कुणालाच सांगता येणार नाही असंही ते म्हणाले आहेत.
देशभरात राम मंदिराचा मुद्दा चालेल असं भाजपला वाटलं होतं. परंतु, तसं काहीच झालेल नाही असा मोठा दावाही तज्ञांनी केला आहे. उलट भाजपच्या 400 पार या घोषणेमुळे भाजपलाच मोठा फटका बसलाय. कारण विरोधकांनी 400 पार या घोषणेला लोकांमध्ये सांगताना यांना संविधान बदलण्यासाठी 400 जागा पाहिजेत असा प्रचार केला. त्यांच्या या प्रचारामुळे दलित, मुस्लिम एकत्र आले आणि त्यांनी विरोधकांना मतदान केलं असं मतही तज्ञांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
अशोक चव्हाण भाजपसोबत गेल्याने तिथलं वातावरण बदलेल अशी चर्चा असली तरी नांदेडमधील जनतेला चव्हाण भाजपसोबत गेल्याचं पटलेलं नाही. त्यामुळे तिथं भाजपची जागा निवडणून येत नाही असा थेट दावा तज्ञांनी केला आहे. त्याचबरोबर, लातूर जिल्ह्यात भाजपने चांगला जम बसवला असला तरी यावेळी विलासराव देशमुख यांच्या मुलांनी जोरदार काम केलं असून तिथेही भाजपच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता नाही असंही ते म्हणाले आहेत.
भाजपकडून पक्ष फोडाफोडीच जे राजकारण झालं ते भाजपसाठी मोठ नुकसाकारक ठरणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नेतृत्व ठरणार आहे. कारण एकदोन जागा शिंदे यांच्या येतीलही. मात्र, अजित पवारांना एकही जागा मिळेल की नाही अशी शंकाही तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर राष्ट्रवादी का फोडली? हे कुणाला कळलं नाही असंही तज्ञांनी मत नोंदवल आहे.
या लोकसभा निवडणुकीत निकाल हे तोडीस तोड असणार आहेत. म्हणजे 24 जागा युतीला मिळाल्या तर 24 महाविकास आघाडीला मिळतील अशी ही निवडणूक झाली. कारण ही निवडणूक कोणत्या नेत्याच्या हातात नव्हती तर ती लोकांनी हातात घेतली होती. या निवडणुकीत प्रामुख्याने दिसलं ते लोकांनी कुणाचंच एकलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील वेगवेगळ वातावरण आपल्याला पाहयला मिळालं तरी यामध्ये ‘भाजपच्या विरोधात लाट’ हा समान धागा राहिला आहे असंही तज्ञांनी आपलं मत नोंदवल आहे.