माजी मंत्री रावसाहेब दानवेंचा बंगला चोरट्यांनी फोडला पण…

Raosaheb Danve : चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी-कोंडा तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न केला.

Raosaheb Danve

Raosaheb Danve

जालना: भाजप नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे ( Raosaheb Danve) यांचा बंगला चोरट्यांनी फोडला आहे. जालना शहरात (jalna) ही घटना घडली आहेत. चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भोकरदन नाका परिसरातील त्यांच्या निवासस्थानी घडली. (Former Minister Raosaheb Danve’s Bungalow Burgled; Case Registered in Jalna)


‘प्रेमाला Conditions Apply’ : प्रेम, करिअर आणि कॉर्पोरेट नियमांच्या कात्रीत अडकलेली जनरेशन!

चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराची कडी-कोंडा तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील लॉकही तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाजार पोलीस पुढील तपास करत आहेत.


विलास घुले प्रकरण, परळीवाल्यांचे ऐकून खोटे आरोप करु नका; जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल


रविवारी रात्री बंद होता बंगला

पिरपिंपळगाव येथील विठ्ठल ज्ञानेश्वर बरकासे हे गेल्या 23 वर्षांपासून दानवे यांच्या जालना येथील शिक्षक कॉलनीतील बंगल्यावर नोकरीला आहेत. रविवारी सायंकाळी माजी मंत्री रावसाहेब दानवे हे बाहेर गेले. तर बंगल्याची साफसफाई करून सात वाजता मुख्य दरवाजा आणि गेटला कुलूप लावून बरकासे हे देखील घरी निघून गेले. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बरकासे हे पुन्हा कामासाठी आले. परंतु त्यांना गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून प्रवेश केला. ते किचनमध्ये देवाला हार घालण्यासाठी जात असताना त्यांना किचनचा दरवाजा उघडा दिसला. जवळ पाहणी केली असता, दरवाजाच्या लॉकची लोखंडी क्लिप तुटलेली असून, खाली लाकडाचा भुसा पडलेला दिसून आला.


चोरीचा प्रयत्न फसला

चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच बरकासे यांनी तत्काळ माजी मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश जोशी यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, घरातील इतर सामानाची नासधूस झाली नसल्याचे किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नसल्याचे स्पष्ट झाले.

Exit mobile version