Gotya Gitte and Walmik Karad beed: बीड जिल्हा गुन्हेगारीमुळे सध्या गाजतोय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Ssantosh Deshmukh) हत्या प्रकरणात गजाआड असलेल्या वाल्मिक कराडच्या (<strong>Walmik Karad) एका साथीदाराचा एक व्हिडिओ सध्या व्हायरला झाला आहे. तो व्हिडिओ पाहिला तर तो कुठल्या भयपटातील किंवा कुठल्या क्राईम वेबसिरीजमधला नाही तो आहे बीडमधील परळीतील. व्हिडिओमधील दिसणारा व्यक्ती आहे गोट्या गिते ( Gotya Gitte). तो काय म्हणतो राम नाम सत्य है ! त्यामागे एक स्टोरी आहे. ज्या व्यक्तीचा खून करायचाय. त्या व्यक्तीच्या घरासमोर मध्यरात्री नैवेद्य ठेवायचा. दुसरा दिवशी त्या व्यक्तीला संपवायचे अशी यामागील स्टोरी सांगितले जाते. असे राक्षसी कृत्य करणारा गोट्या गिते कोण आहे. त्याच्याविरुद्ध राज्यभरात कोणते आणि किती गुन्हे दाखल आहेत.
वाल्मिक कराडचा राईट हँड ते गावठी कट्ट्यांचा सप्लायर
राज्यभरात गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हा गजाआड आहे. परंतु त्याचे अनेक अनेक गुंड हे बाहेर आहेत. त्यातीलच एक गोट्या गिते आहे. तो वाल्मिकचा राईट हँड असल्याचे बोललं जातंय. त्याचे पूर्ण नाव आहे ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गिते. त्याचे गाव परळीतील नंदागौळ आहे. त्याच्याविरुद्ध राज्यातील अनेक पोलिस स्टेशनला 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या सतरा वर्षांपासून गुन्हेगारीत आहे. मध्य प्रदेशमधून गावठी कट्टे म्हणजे पिस्तूल आणून ते विकणे असा त्याचा दहा वर्षांपासूनचा बेकायदेशीर व्यवसाय आहे. बीडसह अनेक जिल्ह्यात तो असे पिस्तूले विकतो. बीडमध्ये जे सर्रास कमरेला पिस्तूल आढळतात, ते गोट्यानेच पुरविल्याचे बोलले जाते. आता त्याच्या काही गुन्ह्यांची यादी आपण पाहुया…
Mahadev Jankar Exclusive : भविष्यात पुन्हा भाजपसोबत जाणार? महादेव जानकर स्पष्टच म्हणाले
देहूतून चांदीचा मुखवटा चोरीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी
2008 मध्ये देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानमधील तुकाराम महाराजांच्या चांदीच्या मुखवटा चोरीला गेला होता. त्यात मुख्य आरोपी हा गोट्या गितेच होता. तर परभणी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. तर बीडमधील युसूफवडगाव येथे चोरी करून खून केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तर परळी शहर, परळी ग्रामीण पोलिस स्टेशनला चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये स्पेशल क्राइम ब्रँचने आंतरराज्यातील शस्त्र विक्रीची टोळी उघडकीस आणली होती. त्यात 15 पिस्तूल आणि आठ काडतुसे जप्त करण्यात आली. त्यात प्रमुख आरोपी हा गोट्या गितेच होता. अनेक गुन्ह्यांची यादी असल्याने त्याला 2017 मध्ये बीडमधून तडीपार केले होते. त्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यांची मालिका सुरूच होती. खुनाच्या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध मोक्का लावण्यात आलेला असला तरी तो सध्या फरार आहे. तो वाल्मिक कराडला दैवत मानतो. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर दैवत अशी त्याची पोस्ट चर्चेत आली होती.
महादेव मुंडेला गोट्या गितेने हाल करून संपविले ?
बरं हा गोट्या गिते आताच चर्चेत येण्याचे कारण म्हणजे राज्यात गाजत असलेले व्यावसायिक महादेव मुंडे हत्या प्रकरण. महादेव मुंडे यांची क्रूर हत्या वाल्मिक कराडचा निकटवर्तीय व्यक्तीने केलीय. त्यात गोट्या गितेचा सहभाग असल्याचा आरोप होतेय. कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनीच पत्रकार परिषद घेऊन गोट्या गितेवर खुनाचा आरोप केलाय. तर गोट्या गितेचा राम नाम सत्य है असा व्हिडिओ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी व्हायरल केलाय. मालक म्हणजे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गोट्या गितेने महादेव मुंडेला संपविले. त्याच्या नरडीचा मांस घेऊन तो हिंडत होता, असा गलधर यांचा दावा आहे.
या सर्व कारनाम्यांवर गोट्या गिते माणूस नसून हैवान, राक्षस आहे. बीडची गुन्हेगारी संपवायची असेल तर असे राक्षस तुरुंगातूनच बाहेर आले नाही पाहिजे, असे बीडकरांना वाटतंय.
“बेजबाबदार अन् बिनबुडाच्या आरोपांकडे दुर्लक्ष, रोज धमक्या येत असताना..”, आयोगाचं राहुल गांधींना सडेतोड उत्तर