Download App

गतवेळी अपघाताने खासदार झालात, 2024 ला माजी होणार! तानाजी सावंतांचे ओमराजेंना आव्हान

धाराशिव : “2019 ते 2024 यादरम्यान आपण अपघाताने खासदार झालात. कोणाला तरी फसवून, धोका देऊन खासदार झालात. या माझ्या 11 लाख जनतेसाठी केंद्रातली आपण आणलेली एक योजना दाखवा. म्हणेल ती पैज हरायला तयार आहे”, असे आव्हान देत आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर टीका केली. (Health Minister Tanaji Sawant criticized Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) MP Omraj Nimbalkar.)

राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये सध्या महायुतीचे मेळावे सुरु आहेत. यातील एक मेळावा काल (14 जानेवारी) धाराशिव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री सावंत बोलत होते. यावेळी मंचावर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेनेचे सहयोगी आमदार राजाभाऊ राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना तानाजी सावंत म्हणाले, एक योजना केंद्राची माझ्या या संपूर्ण गोरगरीब जनतेसाठी, मतदारसंघासाठी मी आणली, हे एक माझे व्हिजन होते. केंद्रातल्या पाच योजना मी महाराष्ट्रातील माझ्या मतदारसंघांमध्ये आणल्या एवढे माझे चॅलेंज आहे. शिवाय महायुती सरकारच्या काळात धाराशिव जिल्ह्याला हजारो कोटी रुपये निधी मिळाला आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. यासाठी विकासाचा रोड मॅप तयार केल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदा शिवसेना खासदाराचे लीड अडीच लाखांचे असणार!

मंत्री सावंत यांनी यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांचा माजी खासदार असा उल्लेख करत धाराशिव लोकसभेचा मागील खासदार एक लाख 28 हजार मतांनी निवडून आला होता. आता यावेळेचा खासदार अडीच ते तीन लाखाच्या लीडने निवडून येणार आहे, असे भाकितही मंत्री सावंत यांनी वर्तविले.

follow us