Download App

अतुल सावेंनी निवडणुकीत पैसे वाटले, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, थेट व्हिडिओच दाखवले…

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील भाजप उमेदवार अतुल सावे (Atul Save) यांनी निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.

  • Written By: Last Updated:

Imtiaz Jalil : दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. तर आता आणखी एका भाजप (BJP) नेत्याने पैसे वाटल्याचा आरोप झाला आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार तुल सावे (Atul Save) यांनी निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.

नाना म्हणतात मी मुख्यमंत्री होणार, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मविआ’ चा ताबा शरद पवारांकडे 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात अतुल सावे यांच्या विरोधात असलेले इम्तियाज जलील हे एमआयएमचे उमेदवार आहेत. आता जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन अतुल सावे यांच्यावर पैसे वाटल्याचे आरोप केलेत. यासंदर्भातील काही व्हिडिओही जलील यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. संबंधित व्हिडिओ महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पाठवले असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अजित पवार हाजीर हो!, निवडणुका संपताच कोर्टाने बजावले समन्स, काय आहे प्रकरण? 

जलील यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवताना अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जवाहर नगर पोलीस ठाण्याजवळील भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात मुस्लिम महिलांना आणून पैसे वाटण्यात आल्याचे जलील यांनी सांगितले. याचा एक व्हिडिओ देखील त्यांनी दाखवला. या ठिकाणी मुस्लिम महिलांना पैसे देऊन बोटाला शाई लावली जात होती, असा आरोप जलील यांनी केला. यामध्ये त्यांनी वकील अरविंद डोणगावकर यांच्यावरही आरोप केले आहेत.

संबंधित व्हिडिओमधील व्यक्ती हा अरविंद डोणगावकर आहे, तो भाजपच्या एका सेलचे प्रमुख आहेत. त्यांचे कार्यालय जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर आहे. तेथे त्यांनी मुस्लिम समाजातील महिलांना रिक्षात भरून आणलं. तिथे त्यांच्या कार्यालयात बसून मुस्लीम महिलांना प्रत्येकी 1000 रुपये, जे अधिक मागत होत्या, त्यांना 2000 रुपये दिले, असा आरोप जलील यांनी केला.

याबाबत त्यांनी दुसरा एक व्हिडिओ देखील पत्रकारांना दाखवला. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जालिंदर शेंडगे यांनी बोगस महिला मतदानासाठी आणल्या होत्या, असा आरोप जलील यांनी केला. आंबेडकर नगर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला असून तेथील नागरिकांनीच मला याबाबतची माहिती दिल्याचा दावाही जलील यांनी केला.

दरम्यान, जलील यांनी केलेल्या आरोपांवर आता अतुल सावे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us